बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

By अनिल लगड | Published: February 29, 2024 07:11 PM2024-02-29T19:11:04+5:302024-02-29T19:11:36+5:30

पहिल्याच बैठकीत पाच लाख रूपये जमा

The ideal step of the Beed citizens; Fifty percent of women in the Jaibhim Mahotsav Committee | बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

बीड : अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालुन देणाऱ्या बीड जयभीम महोत्सवाच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने आणखी एक आदर्श पाऊल उचलले आहे. आयोजन समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान देण्यात आले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे २८ फेब्रुवारी रोजी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. विचार मंचावर बैठकीचे अध्यक्ष अरुण भोले, प्रा.प्रदिप रोडे, राजू जोगदंड, ॲड.भगवान कांडेकर, प्रशांत ससाणे, रवि वाघमारे, राजेंद्र जोगदंड, अशोक वीर, माया मिसळे, संगिता वाघमारे, पूनम वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी २०२४ च्या जयभीम महोत्सव संयोजन समिती प्रमुखपदी अरुणा आठवले, शैलजा ओव्हाळ, माया मिसळे, संगीता वाघमारे, पुष्पा तुरुकमारे, अनिता डोंगरे, लक्ष्मी सरपटे, नंदिनी ओहळ, पुनम वाघमारे, भगवान कांडेकर, अशोक ठोकळ, प्राचार्य प्रदीप गाडे,प्रा.अशोक गायकवाड,प्रा. पांडुरंग सुतार, सुमेध जोगदंड, वशिष्ठ तावरे, इंजि राहुल सोनवणे, तानाजी शिनगारे, सचिन वडमारे यांची सर्वानुमते समितीत निवड करण्यात आली.

Web Title: The ideal step of the Beed citizens; Fifty percent of women in the Jaibhim Mahotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.