कारागृहातून सुट्टीवर येऊन फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:45 PM2022-07-15T19:45:56+5:302022-07-15T19:46:31+5:30

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता कारागृहात

The accused who absconded from the jail on leave is finally in the custody of the police | कारागृहातून सुट्टीवर येऊन फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

कारागृहातून सुट्टीवर येऊन फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

अंबाजोगाई-: खुनाच्या शिक्षा भोगत असताना सुट्टी मिळाल्याने गावाकडे आलेल्या आरोपीने परत न जाता फरार झाला. दीड महिना पोलिसांना हुलकावणी देत असताना पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडुन शुक्रवारी ताब्यात घेतले.त्याची रवानगी आता तुरुंगात होणार आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा येथील मानसिंग ऊर्फ जामु प्रभु राठोड याला १० जुलै २०१८ रोजी ११२ /२१४,३०२ कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली.तो आपली शिक्षा  औरंगाबाद येथील हार्सुल कारागृहात भोगत आहे.शिक्षा भोगत आसलेला आरोपी हा कोरोना काळात गावी सुट्टीवर आला होता.सुट्टी संपली तरी तो कारागृहात परतला नाही. या बाबद हार्सुल कारागृहाच्या वतीने मानसिंग यास पत्रव्यव्हाराने परत येण्याबद्दल आनेक वेळा कळवले होते.त्याला ताब्यात घेण्यासाठी कारागृहाच्या वतीने प्रयत्न केला.परंतु  तो गुंगारा देऊन जात होता. त्यामुळे हर्सुल कारागृहाच्या वतीने चार दिवसापुर्वी ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे राठोड विरोधात २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी राडीतांडा येथे मानसिंग राठोड आल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना मिळाली.

त्या माहितीच्या आधारे  मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  एस.डी.शिनगारे, बि.एम. घुगे व ईतर कर्मचारी शुक्रवारी सकाळी आरोपीच्या शोधात गेले .पोलीस पाहाताच राठोड ऊसात लपुन बसला. ऊसात लपलेल्या राठोडचा पोलीसांनी पाठलाग करताच तो चिखल व पाणी आसलेल्या शेतातून पळत सुटला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घातले.  व पोलीस स्टेशनला हजर केले.स्वाराती रुग्णालयात आरोग्य तपासणी करून आता त्याची रवानगी  कारागृहात करण्यात येणार आहे.

Web Title: The accused who absconded from the jail on leave is finally in the custody of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.