टँकर निविदा दर वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:35 AM2018-12-20T00:35:07+5:302018-12-20T00:35:41+5:30

जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने टँकर मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.

Tanker raised the tender rates | टँकर निविदा दर वाढवले

टँकर निविदा दर वाढवले

Next
ठळक मुद्देतीव्र पाणी टंचाई : टँकर सुरू करण्याची मागणी; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने टँकर मागणीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यासाठी दिरंगाई होत आहे. तसेच जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी दर कमी असताना चढ्या दराने भरलेल्या टँकरच्या निविदा रद्द केल्यानंतर, शासनाने बुधवारी नव्याने टँकर निविदा दर वाढवले आहेत. त्यामुळे पुन्हा फेरनिविदा भरल्या जाणार आहेत. मात्र पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. त्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरुन टँकर मागणीचे प्रस्ताव दिले आहेत, तसेच तात्काळ मंजुरी मिळावी, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकर प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार दिलेले आहेत. मात्र तरी देखील शेकडो प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. टँकर सुरु नसले तरी प्रशासकीय मान्यता तरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात येत आहे.
चढ्या दराने भरलेल्या निविदा जिल्हाधिकाºयांनी रद्द केल्यानंतर, बुधवारी आलेल्या शासन निर्णयानुसार टंचाई भागात पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे टँकरचे प्रतिटन दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा फेरनिविदा भराव्या लागणार आहेत.
शासनाचे पुर्वीचे दर २०१२ या वर्षातील होते मात्र यावर्षातील डिझेल व वाहतुकीचे दर वाढलेले असल्यामुळे शासनाने निविदा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी फेरनिविदा भराव्या लागणार आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन टँकर सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र टंचाई परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे देखील पाणी टंचाईच्या तीव्रतेपासून व नागरिकांना होणाºया त्रासापासून जिल्हा प्रशासन व शासन अनभिज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया खडकी घाट येथील सरपंच महारुद्र वाघ व पालसिंगण येथील सरपंच विक्रम खंडागळे यांनी दिली. तसेच तात्काळ निर्णय घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Web Title: Tanker raised the tender rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.