पथदिवे बंद; बीड शहर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:12 AM2018-02-07T01:12:04+5:302018-02-07T01:13:49+5:30

Street lights off; Bead city in the dark | पथदिवे बंद; बीड शहर अंधारात

पथदिवे बंद; बीड शहर अंधारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महावितरणे आडमुठे धोरण आवलंबत नगर पालिकेने थकबाकी न भरल्यामुळे पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री पूर्ण बीड शहर अंधारात होते. नगर पालिका आणि महावितरणाच्या थकबाकीच्या वादात बीडकरांना वेठीस धरले जात असून अंधाराचा फायदा घेत, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरातील पथदिव्यांची वीज जोडून बीडकरांचा हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मागील काही दिवसांपासून बीड शहरात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच काळजी घेण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले जात आहे. एकीकडे चोºयांवर नियंत्रण मिळवून चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असताना दुसºया बाजुला मात्र महावितरणने पथदिव्यांची वीज जोडणी तोडून चोरट्यांना एकप्रकारे पाठबळ दिल्याची चर्चा सुरू आहे. महावितरणच्या या आडमुठेपणाबद्दल सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वर्षभर वीज बील थकबाकीकडे दुर्लक्ष करणाºया महावितरणला आर्थिक वर्ष संपत आली की अचाकन जाग आली आहे. आपला गलथान कारभार आॅडीच्या माध्यमातून चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचे दिसून येत आहे. पथदिवे कनेक्शन तोडून बीडकरांचे हाल करण्यापेक्षा थकबाकी भरत नाही, म्हणून सर्वसामान्यांप्रमाणे नगर पालिकेवरच थेट कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

पालिकाही उदासिन
नगर पालिकेची थकबाकी वसुल करण्यासाठी पालिकेने पथके नियूक्त केली आहेत. परंतु आपल्याकडे थकबाकी भरण्यास पालिका उदासिन असल्याचे दिसून येते. पालिकेच्या गलथान कारभारामुळेच बीडकरांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. थकबाकी भरण्याची मागणी आहे.

पालिकेकडे किती थकबाकी आहे, याचा नक्की आकडा सांगता येणार नाही. त्यांच्याकडे थकबाकी असल्यसानेच पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे.
-विनय घनबहाद्दूर
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, बीड

Web Title: Street lights off; Bead city in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.