धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:31 PM2022-09-19T13:31:26+5:302022-09-19T13:31:53+5:30

बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वतः बोटच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात शोधकार्यात सहभागी झाले आहेत. 

Shocking! A jawan who went in search of a doctor in Majalgaon dam has disappeared, the search for both is on | धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु

धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (बीड):
तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ ( ४५)  हे रविवारी सकाळी ८ वाजता माजलगाव धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह २४ तास उलटूनही सापडला नाही. दरम्यान, डॉक्टरच्या शोधार्थ पाण्यात उतरलेला केडीआरएफचा एक जवान तीन तासांपासून गायब आहे. 

तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे त्यांचे खाजगी हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात. दररोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी ते पोहायला गेले असताना दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

मच्छीमार, परळी व बीड येथील पथकाने त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला. रविवारी डॉक्टरचा शोध लावू शकला नव्हता. त्यामुळे सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील केडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. हे पथक पाण्यातून शोधाकार्य करत आहे. दरम्यान, या पथकातील राजू मोरे हा जवान मागील तीन तासांपासून पाण्यात गायब आहे. धरणाच्या पाण्यातून बाहेर आला नसल्याने आता डॉक्टरसोबत जवानाचा देखील शोध सुरु आहे. आज सकाळी बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वतः बोटच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात शोधकार्यात सहभागी झाले आहेत. 

Web Title: Shocking! A jawan who went in search of a doctor in Majalgaon dam has disappeared, the search for both is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.