गोवंशीय प्राण्यांचे विक्रीसाठी साठवलेले २०० किलो मांस जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:29 PM2022-12-10T12:29:36+5:302022-12-10T12:30:24+5:30

या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत. 

Seizure of 200 kg meat of bovine animals stored for sale; A case has been registered against both | गोवंशीय प्राण्यांचे विक्रीसाठी साठवलेले २०० किलो मांस जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

गोवंशीय प्राण्यांचे विक्रीसाठी साठवलेले २०० किलो मांस जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

Next

- नितीन कांबळे 
कडा -
विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तलकरून विक्रीसाठी साठलेले २०० किलो मांस शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आष्टी पोलिसांनी तलवार नदी परिसरातून जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आष्टी शहरातील तलवार नदीच्या किनाऱ्या लगत कुरेशी गल्ली येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करण्यासाठी साठवल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी छापा टाकून २०० किलो मांस ( बाजारमूल्य ३६००० हजार रू. ) जप्त केले. 

याप्रकरणी शाकेर कुरेशी आणि अरबाज शाकेर कुरेशी ( रा.आष्टी ) यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. 

ही कारवाई आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, उपनिरीक्षक प्रमोद काळे, अजित चाटे, पोलिस उपनिरीक्षक सातव यांनी केली. 

Web Title: Seizure of 200 kg meat of bovine animals stored for sale; A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.