‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:52 PM2019-06-04T23:52:27+5:302019-06-04T23:56:26+5:30

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.

'Save water, save animals' | ‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

Next
ठळक मुद्देसर्पराज्ञी संस्थेने १६ हजार वन्य जिवांना दिले जीवदान ; दुष्काळी गावे होताहेत पाणीदार

विजयकुमार गाडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर कासार : पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.
वन्यजीव असणे हे चांगल्या वनांचे प्रतीक मानले जाते. वन आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून असते. ‘जीवो जीवस्य जीवणम’ ही तत्व प्रणाली जंगलात पहावयास मिळते. इथे प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यातील एक जीव जरी नष्ट झाला तर त्याचा दुरगामी परिणाम हा इतर जीवांवर आपोआप होत असतो.पर्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो.पर्यावरणातील जैवविविधता ही पर्यावरणातील जैविकसाखळीची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तागडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सोळा हजार वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.त्यांचे हे पर्यावरणातील कार्य कौतुकास्पद आहे.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले गेले तर विशेषत्वाने त्यांचा परिणाम माणसाला भोगावा लागेल. त्याकरिता निसर्गदत्त सर्वव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे आहे. आणि ती टिकवण्याची जबाबदारी कुण्या एका सरकारची , सेवाभावी संस्थेची नसून ती आपली सर्वांची असल्याचे निसर्ग मित्र व प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले.
आजच्या एका दिवसापूरते पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरण रक्षण करता येणार नाही. ती शासनाची जबाबदारी आहे असे म्हणूनही चालणार नाही. वन्यप्राण्याच्या चारा, पाण्याची व्यवस्था जंगलात करणे गरजेचे असून, यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण आणि वन्यजीव रक्षण ही प्रत्येकाची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे, असे संचालक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.

Web Title: 'Save water, save animals'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.