संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:43 AM2018-07-10T05:43:10+5:302018-07-10T05:43:32+5:30

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे.

 Saint Eknath's Palkhi Festival will be a lot of trouble! | संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच!

संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याची वाट खडतरच!

googlenewsNext

पाटोदा (जि. बीड) : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. पालखी मात्र पारंपरिक मार्गावरूनच जाणार असल्याने वारकऱ्यांची वाट ‘खडतर’ असणार आहे. २० वर्षांपूर्वी केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे वेगळी वाट निर्माण झाली आहे.
तत्कालीन युती सरकारच्या काळात राज्यातील पालखी रस्ते राज्य महामार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय झाला. हे सरकार असतानाच्या काळात झालेल्या कामानंतर रस्ते अर्धवट राहिले. त्यात पैठण-पंढरपूर रस्त्याचे कामही रखडले. तीन वर्षांपूर्वी राज्यात
आणि केंद्रातही भाजपा मित्र पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. केंद्रीय
रस्ते विकास व जहाजबांधणी
मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वच पालखी रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता दिली. मोठ्या स्वरूपात निधीही दिला. सध्या पैठण - पंढरपूर मार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे.
प्रशासकीय यंत्रणेने संबंधितांना विश्वासात न घेताच सर्वेक्षण केले. त्यामध्ये शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील पालखी मार्गच बदलून टाकला. नाथांची पालखी पैठण - चनकवाडी - पाटेगाव - दादेगाव - मुंगी - हदगाव - बोधेगाव - बालमटाकळी - वाडगव्हाण - शेकटे - कुंडल पारगाव - भगवानगड - माळेगाव - मुंगसवाडे - दहिवडी - शिरूर कासार - कान्होबाचीवाडी -कोळवाडी -राक्षसभुवन -विघनवाडी -खोल्याचीवाडी - डोळ्याची वाडी - सांगळवाडी -डिसलेवाडी - रायमोहा - धनगरवाडी - हाटकरवाडी - महेंद्रवाडी - गारमाथा -उंबरविहिरा - तांबाराजुरी - पाटोदा - पारगाव घुमरा - अनपटवाडी - डिघोळ -मोहरी मार्गे खर्डा आणि पुढे पंढरपूरला जाते.
सर्वेक्षण करणाºया यंत्रणेने शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील सर्वेक्षणच चुकीचे केले. यामध्ये शिरूर - राक्षसभुवन - विघनवाडी येथून पुढे रस्ता कारेगाव - डोंगरकिन्ही - चुंबळी - कडे वळवला. आता राष्ट्रीय महामार्ग असाच बांधला जात आहे. वास्तविक पारंपारिक पालखी मार्ग खोल्याची वाडी येथून डोळ्याची वाडी - सांगळवाडी - डिसलेवाडी - रायमोहा - धनगरवाडी - हटकरवाडी -महेंद्रवाडी - गारमाथा - उंबरविहिरा - तांबाराजुरी - पाटोदा असा आहे. सध्या होत असलेल्या आणि पारंपरिक मार्गात सुमारे २० किमीचा मार्गच बदलला आहे.

Web Title:  Saint Eknath's Palkhi Festival will be a lot of trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.