'अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले नेतृत्व हरपले', विनायक मेटेंच्या निधनावर रजनी पाटील यांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:55 PM2022-08-14T14:55:31+5:302022-08-14T15:09:12+5:30

'सरकार कोणतेही असो त्यांचे सर्व सर्वाशी अतिशय चांगले संबध असायचे. त्यातुन ते सामाजिक कामे करत होते.'

Rajni Patil's feelings on Vinayak Mete's death: 'Leadership born from very adverse circumstances is lost' | 'अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले नेतृत्व हरपले', विनायक मेटेंच्या निधनावर रजनी पाटील यांच्या भावना

'अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले नेतृत्व हरपले', विनायक मेटेंच्या निधनावर रजनी पाटील यांच्या भावना

googlenewsNext

केज- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक बीड माजी आ.विनायक मेटे यांचे आज पहाटे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. अनेक नेते मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनीही मेटेंच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला. 

'विनायक मेटेंचे झालेले अपघाती निधन मनाला चटका लावणारे आहे. अतिशय प्रतिकूल पारस्थितीतून घडलेले हे नेतृत्व होते. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले ते नेते होते.  विनायक मेटे हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर सकल समाजाचे ते नेते होते. अति सामान्य कुंटुंबातुन आलेले प्रचंड आत्मविश्वास जिद्द व मेहनतीची पराकाष्ठा म्हणजे विनायकराव मेटे. शिवसंग्रामच्या माध्यमातुन त्यांनी उत्तम संघटन व भरीव सामाजिक कार्य त्यांनी केले.'

'सरकार कोणतेही असो त्यांचे सर्व सर्वाशी अतिशय चांगले संबध असायचे. त्यातुन ते सामाजिक कामे करत होते. बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. बीड चा परत एक उद्धार कर्ता आपण गमावला असून ही पोकळी आता भरून निघने कठीण आहे. विनायक मेटे यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सर्व पाटील परिवार सहभागी आहोत. या धक्क्यातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना, अशा शब्दात रजनी पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

अतिशय मनमिळावू नेतृत्व गेलं

अत्यंत दुर्दैवी सकाळ आजची ठरली आहे. मराठा समाजाच्या बाबतीत आण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटे यांनी आजपर्यंत काम केले. चळवळीला न्याय मिळावा, यासाठी ते नेहमी झटत राहिले. समाजाच्या सवलती बाबतीत, आरक्षण मिळविण्याच्या लढ्यात मराठा समाजाच्या कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने फक्त शिवसंग्राम नाही, तर बीड जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली आहे.- आ. सुरेश धस

Web Title: Rajni Patil's feelings on Vinayak Mete's death: 'Leadership born from very adverse circumstances is lost'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.