शौच्छालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 03:59 PM2019-05-08T15:59:14+5:302019-05-08T16:01:40+5:30

खेळता-खेळता चिमुकली अचानक हौदात पडली

one and half years girl child's death due to drowned in the toilet tank at Beed | शौच्छालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

शौच्छालयाच्या हौदात बुडून चिमुकलीचा मृत्यू

Next

बीड : घरासमोर खेळत असताना शौच्छालयासाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडून बुडाल्याने एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी शिरुर कासार तालुक्यातील नांदेवली गावात घडली. 

अनुष्का कानिफनाथ थिटे असे बुडून मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अनुष्का ही घरासमोर खेळत होती. घराच्या बाजुलाच शौच्छालयासाठी हौद बांधण्यात आलेला असून त्यात पाणी होते. खेळता-खेळता ती चिमुकली अचानक हौदात पडली अन पाण्यात बुडाली. तिच्या पालकांना हा प्रकार लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन तिला मयत घोषीत केले. या प्रकरणी कानिफनाथ थिटे यांच्या खबरेवरुन रुग्णालय चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: one and half years girl child's death due to drowned in the toilet tank at Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.