परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 06:40 PM2017-12-13T18:40:50+5:302017-12-13T18:43:17+5:30

परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले.

The number of people killed in Vaidyanath factory crash in Parli increased | परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

googlenewsNext

बीड : परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 12 जण जखमी झाले होते. बारापैकी दहा जणांना लातुरच्या लहाने हॉस्पीटलमध्ये तातडीने घटनेच्या दिवशीच शुक्रवारी उपचारार्थ दाखल केले होते. या दहाजणांपैकी एकुण 6 जणांचा मृत्यु झाला आहे. कारखान्यातील कर्मचारी सुभाष कराड (लिंबोटा), सुमित भंडारे, सुनिल भंडारे (देशमुख टाकळी), गौतम घुमरे (गाडे पिंपळगाव), राजाभाऊ नागरगोजे (मांडेखेल), मधुकर आदनाक (धानोरा) यांचा मृतामध्ये समावेश आहे. दरम्यान  आज वैद्यनाथ कारखान्याच्या संचालीका अ‍ॅड.यशश्री मुंडे यांनी नागरगोजे कुटूंबीयांचे मांडेखेल येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.

Web Title: The number of people killed in Vaidyanath factory crash in Parli increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.