जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही; १३ वर्ष संघर्ष करीत फोडला कर्जाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:48 PM2019-02-25T23:48:51+5:302019-02-25T23:52:31+5:30

तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Not stubborn, land is not sold; 13 year war broke out in debt | जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही; १३ वर्ष संघर्ष करीत फोडला कर्जाचा डोंगर

जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही; १३ वर्ष संघर्ष करीत फोडला कर्जाचा डोंगर

Next
ठळक मुद्देकाळेगावचे शेतकरी बद्रीनारायण मोटारकरला झाले आकाश मोकळे

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कुठलेच व्यसन नसलेले चौथी पास बद्रीनारायण मोटारकर यांच्याकडे तीन एकर जमीन. २००६ मध्ये त्यांनी एसबीआयकडून २ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज मोसंबी फळबागेसाठी घेतले होते. तसेच ६५ हजार रु पयांचे पीक कर्ज घेतले होते. मार्च २००७ ते फेब्रुवारी २००८ च्या दरम्यान केंद्र सरकारने पाच एकरच्या आतील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले होते. पण मोटारकर यांचे कर्ज माफ झाले नव्हते. तसेच दुष्काळात मोसंबीची संपूर्ण फळबाग उद्ध्वस्त झाली. तीन मुलांचे शिक्षण, घरचा प्रपंच याची चिंता होती. तरीही ते खचले नाहीत, वेळोवेळी न्याय मागत होते. घरच्या बिकट परिस्थितीत मुलीच्या शिक्षणाला विराम द्यावा लागणार होता. मात्र, डॉक्टर होण्याची तिची जिद्द होती. बीड येथील प्रा. अर्जुन भोसले, प्रा. राम, प्रा. बाबुराव नप्ते यांनी मोटारकार यांच्या मुलीला तीन वर्ष मोफत शिकवले. योगायोगाने तिला एम. बी. बी. एस. साठी प्रवेशही मिळाला.
एकीकडे समाजाचे बळ मिळत असताना दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली. बँकेचे १० लाख आणि सावकाराचे ४ लाख मिळून १४ लाख रु पयांच्या कर्जाचा डोंगर झाल्याने बद्रीनारायण मोटारकार घाबरु न गेले होते. मात्र ते लढत राहिले.
‘लोकमत’ने त्यांची व्यथा वेळोवेळी मांडली. शेतीतील कसेबसे मिळणाऱ्या उत्पन्नातून फेड करत सावकारी पाश फेकून दिला. बॅँकेच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालय आणि लोकप्रतिनिधींकडे सतत नऊ वर्ष चकरा मारल्या. कर्जाचा डोंगर चढलेला असतानाही त्यांनी जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही. तेरा वर्षांचा संघर्ष संपला, माझ्यासाठी आकाश मोकळे झाले आहे. आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे मोटारकार म्हणाले.
‘लोकमत’चा आधार मोलाचा
२०१६ मध्ये आपल्या नावावर उचललेल्या बोगस कर्जाबाबत मोटारकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे सोशल मिडीयाद्वारे न्याय मागितला. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोन करत नेहमी धीर दिला. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनीही लक्ष घातले. मुंबईचे कैलास जेबले, एसबीआयचे अधिकारी या सर्वांमुळे कर्जाचा फेरा सुटल्याचे सांगताना लोकमतचा आधार मोलाचा ठरल्याचे मोटारकार म्हणाले.
मकरंदमुळे दात्यांचा आधार
काळेगावच्या ग्रामस्थांनी वर्गणी जमा करुन गावच्या लेकीच्या (मोटारकर यांची मुलगी) वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सांगण्यावरुन मुंबई येथील मिलिंद पर्वते, डॉ. रानडे यांनीही मानिसक आणि आर्थिक आधार देण्याचे काम वेळोवेळी केल्यामुळे मुलीचे कोल्हापूर येथे एमबीबीएस दुसºया वर्षात शिक्षण सध्या सुरू आहे.

Web Title: Not stubborn, land is not sold; 13 year war broke out in debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.