बीडमधील कार अपघातात नांदेडचे पांडे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 08:25 PM2019-05-16T20:25:21+5:302019-05-16T20:28:28+5:30

पुण्याला जाताना बीड जिल्ह्यात झाला अपघात

Nanded's Pandey couple killed in a car accident in Beed | बीडमधील कार अपघातात नांदेडचे पांडे दाम्पत्य ठार

बीडमधील कार अपघातात नांदेडचे पांडे दाम्पत्य ठार

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू

कुसळंब (बीड ) : नांदेडवरुन पुणे येथे जात असताना बीड-अ.नगर मार्गावरील अंमळनेरनजीक कार (एम.एच.२६ ए.के. ३६७६) रस्ता सोडुन बाजूच्या खड्डयात गेली. या अपघातातनांदेड येथील पांडे दाम्पत्य जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली. जखमींवर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पांडुरंग दासराव पांड (५९ ) व उदया पांडुरंग पांडे (५५) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. तर भाऊ ब्रम्हानंद दासराव पांडे (४२) व पुतण्या प्रतिक ब्रम्हानंद पांडे (१६) यांचा जखमींत समावेश आहे. मिळालेल्या माहितीनूसार पांडे कुटुंब हे पुणे येथे आपल्या खाजगी कामासाठी कारमधून जात होते. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर नजीक दौलतवाडीत अचानक कार मुख्य रस्त्याच्या खाली गेली. कारने पलट्या खाल्याने कारमधील उदया व पांडुरंग पांडे हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर भाऊ ब्रम्हानंद आणि पुतण्या प्रतिक हे बापलेक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ बीडला हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

कारमधील पाचवा व्यक्ती श्रेयश दासराव पांडे (२४) हा कार चालवित होता. या अपघातात त्याला जखम झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, मयत पांडुरंग पांडे हे नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नाना पवार, पप्पू  पवार, सरपंच राजेंद्र ईथापे, उद्धव शेठपवार, रामनाथ भनगे, बबन पवार आदींनी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, जमादार फुलेवाड, गुंडाळे, आघाव, संतोष काकडे, शिणगारे, सानप आदींनी धाव घेतली.

Web Title: Nanded's Pandey couple killed in a car accident in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.