पावसाच्या खंडाने माजलगाव तालुक्यातील 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:04 PM2018-06-14T20:04:25+5:302018-06-14T20:04:25+5:30

पावसात खंड पडल्याने तालुक्यातील जवळपास 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात आली आहे.

In Majalgaon taluka, Due to delay in rain over 10 thousand hectares cotton crop in danger | पावसाच्या खंडाने माजलगाव तालुक्यातील 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात

पावसाच्या खंडाने माजलगाव तालुक्यातील 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात

Next

माजलगाव (बीड ) : मागील आठवड्यात तालुक्यात एकच पाऊस पडला तोही जेमतेम स्वरूपाचा. या पावसावरच शेतकऱ्यांनी पुढील पावसाचा कसल्याही अंदाज न घेता कपाशीची लागवड केली. मात्र आता पावसात खंड पडल्याने तालुक्यातील जवळपास 10 हजार हेक्टरवरील कपाशी लागवड धोक्यात आली आहे.  

या महिन्याच्या सुरुवातीला शहर आणि तालुक्यात मान्सून पूर्व दमदार पाऊस झाला. या पावसावरच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर कपाशी लागवड उरकली. एका आठवड्यात जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. मात्र आता पावसात खंड पडला आहे. तसेच सरकारी यंत्रणांच्या माहिती येत्या काळात पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत.यामुळे बागायती क्षेत्र वगळता इतर क्षेत्रावरील कापुसपेरा धोक्यात सापडला आहे.  

किमान 100 मि.मि. पाउस होईपर्यंत शेतक-यांनी पेरणी न करण्या बाबत वारंवार सुचना केले होत्या. तसेच आगामी काळात देखील शेतक-यांनी किमान 100 मि.मि. पाउस होईपर्यंत पेरणी करु नये.
- एस. एस. हजारे, कृषि अधिकारी, पंचायत समिती

Web Title: In Majalgaon taluka, Due to delay in rain over 10 thousand hectares cotton crop in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.