दुकान तोडफोड प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी माजलगावात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:24 PM2017-12-18T14:24:11+5:302017-12-18T14:25:21+5:30

शहरातील मुख्य रस्त्यावरील मिठाईच्या दुकानाची तोडफोड प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी सोमवारी माजलगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती, याला शहरातील व्यापारी महासंघासह, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Majalgaon market closed, demanding arrest of the accused in the shop attack case | दुकान तोडफोड प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी माजलगावात कडकडीत बंद

दुकान तोडफोड प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी माजलगावात कडकडीत बंद

googlenewsNext

माजलगाव (बीड) : शहरातील मुख्य रस्त्यावरील मिठाईच्या दुकानाची तोडफोड प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी सोमवारी माजलगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती, याला शहरातील व्यापारी महासंघासह, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरातील मुख्य रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व ठक्कर बजार परिसरातील दोन मिठाईच्या दुकानावर शनिवार (दि.16) रात्री 8 वाजता  15 ते 20 युवकांनी हल्ला केला होता. यावेळी लोखंडी गज, विटा घेवून दुकानात प्रवेश करत त्यांनी हैदोस घालत दुकानाची तोडफोड केली. या हल्लेखोरांचा अद्याप पोलीसांना तपास लागला नसल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण आहे. यामुळे या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये व्यापारी महासंघ, शिवसेना, भाजप, मराठा आरक्षण कृती समिती, शिवसंग्रामचे पदाधिकार्‍यासह व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होती.  या रॅलीमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अनंतदादा रूद्रवार, सचिव दिलीप चिद्रवार, सुरेश रेदासणी, जफरभाई मिर्झा, रियाज काजी, सुनिल भांडेकर, रमेश चांडक, नंदकुमार आनंदगांवकर, शशीकिरण गडम, ईश्‍वर होके, रामराजे रांजवण, सज्जन काशिद, निलेश सोळंके यांच्यासह  शिवसेनेचे डॉ.उध्दव नाईकनवरे, मराठा आरक्षण कृती समितीचे राजेंद्र होके पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हनुमान कदम, शहरप्रमुख अशोक आळणे, पापा सोळंके, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष उत्तम पवार यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते व व्यापारी सहभागी होते.

आडत व्यापार्‍यांनी पाळला बंद
माजलगाव शहरातील स्विटमार्ट तोडफोड प्रकरणातील हल्लेखोरांच्या अटकेसाठी आडत व्यापार्‍यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवली. त्याच बरोबर दहशतीखाली असलेल्या शहरातील मिठाई व्यावसायिकांनी सलग तिसऱ्या दिवशीही आपली दुकाने बंद ठेवली. 

Web Title: Majalgaon market closed, demanding arrest of the accused in the shop attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड