कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:33 AM2018-12-07T00:33:31+5:302018-12-07T00:33:52+5:30

पूर्णवादी बँकेच्या येथील शाखेकडून कर्जदार मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने कलम १३८ निगोशिएबल अ‍ॅक्टप्रमाणे सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा न्या. भारत बुरांडे यांनी बुधवारी सुनावली.

Loan repayment cheque bounced; Six lakh penalty | कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड

कर्जाच्या परतफेडीचा धनादेश अनादरित; सहा लाखांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : पूर्णवादी बँकेच्या येथील शाखेकडून कर्जदार मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने कलम १३८ निगोशिएबल अ‍ॅक्टप्रमाणे सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा न्या. भारत बुरांडे यांनी बुधवारी सुनावली.
माजलगाव येथील पुर्णवादी बँकेच्या शाखेकडून पाच लाख रूपयांचे कर्ज मंदाकिनी सदाशिव कुटे यांनी व्यवसायासाठी घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीसाठी पाच लाख ७८ हजार ५५९ रूपयांचा धनादेश दिला होता. सदरील धनादेश न वटल्याने या प्रकरणी फिर्यादी शाखाधिकारी रावसाहेब देशमुख यांनी कर्जदार मंदाकिनी कुटे यांच्याविरूध्द न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदरील धनादेश अनादरित झाल्याने सदरील प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले. तर फिर्यादी रावसाहेब देशमुख यांच्या साक्षीला आधार करून मंदाकिनी कुटे यांना सहा लाख रूपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहा लाख रूपये न दिल्यास पुन्हा सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बँकेतर्फे अ‍ॅड. अरूण लवुळकर यांनी काम पाहिले.

Web Title: Loan repayment cheque bounced; Six lakh penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.