आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 04:34 PM2020-02-05T16:34:26+5:302020-02-05T16:36:06+5:30

’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

Honor of 150 widows of suicidal farmers by newly married couple | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

Next
ठळक मुद्देऐश्वर्या व निखिल या नवदांपत्यांचा निर्णय 

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई: विवाहानंतर सासरी येताच आयोजित स्वागत समारंभाची सुरुवात नव वधु-वरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना साडीचोळी भेट देऊन, त्यांचा सन्मान करून आपल्या  नवीन आयुष्याची सुरुवात केली. हा उपक्रम ’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे येथील उद्योजक व्यंकटराव शिंदे यांचे सुपुत्र निखिल याचा विवाह पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार  यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला.विवाहाप्रीत्यर्थ मंगळवारी भारज येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्वागत समारंभाची सुरुवात नवदाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करून केली. या सर्व महिलांना साडीचोळीचा आहेर  भेट देण्यात आला. तसेच या सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. 

विवाहावर लाखो रुपयांची उधळण, आतिषबाजी व विविध माध्यमांतून केली जाते. समाजात शुभकार्यात विधवांना दूर ठेवले जाते. मात्र, शिंदे व पवार कुटुंबियांनी आपल्या या नवीन वधूवरांची आयुष्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जोपासून केली. यावेळी भव्य समारंभ घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ, अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रूईकर, उपनगराध्यक्षा सविता लोमटे, ज्योती शिंदे, अशोकराव कदम, संयोजक व्यंकटराव शिंदे, शिवाजी शिंदे, वसंत शिंदे, आधार माणुसकीचा चे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Honor of 150 widows of suicidal farmers by newly married couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.