५३ वर्षांत प्रथमच १० दिवसांआड परळीला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:54 AM2019-05-12T00:54:44+5:302019-05-12T00:55:12+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या नागापूर वाण मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. जोत्याखाली पाणी आले आहे.

For the first time in 53 years, water for 10 days | ५३ वर्षांत प्रथमच १० दिवसांआड परळीला पाणी

५३ वर्षांत प्रथमच १० दिवसांआड परळीला पाणी

Next
ठळक मुद्देनागापूरचे वाण प्रकल्प कोरडेठाक। शहरात पालिकेकडून ३० टँकद्वारे पाणीपुरवठा

संजय खाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या नागापूर वाण मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. जोत्याखाली पाणी आले आहे. १९६६ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गेल्या ५३ वर्षांत यंदा पहिल्यांदाच वाण प्रकल्प कोरडाठाक पडल्यात जमा झाला आहे. त्यामुळे परळी नगर परिषदेवर १० दिवसांआड पाणी पुरविण्याची प्रथमच वेळ आली. मात्र रमजान सणामुळे १० ऐवजी आठ दिवसांआठ पुरवठ्याचा निर्णय झाला.
१९६१ मध्ये पाटबंधारे विभागाने नागापूरच्या धरणाचे बांधकाम सुरू केले व ते काम १९६६ मध्ये पूर्ण झाले. या धरणाची एकूण लांबी २,८०६ मीटर, तर सांडव्याची एकूण लांबी ६१८ मीटर आहे. उंची २०.३० मीटर आहे. धरणातील पाणी साठ्याची उंची १९ मीटर आहे.
या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये नागापूर, माळहिवरा, मांडेखेल, तळेगाव, पांगरी, तडोळी, भिलेगाव, परचुंडी, लिंबोटा व इतर काही गावांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने शेतीसाठी पाणी पाटबंधारे विभागाने बंद केले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासही या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
परळीची लोकसंख्या १ लाखावर असल्याने पाणी टंचाई भासू नये म्हणून नगर परिषदेच्या वतीने ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरसाठी पाणी चांदापूर रोडवरील वैयक्तिक मालकीच्या २ बोअरमधून घेण्यात येत आहे. शहरात नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे कामही २०११ पासून चालू आहे. काही वस्त्यांत या योजनेतून पाणी मिळत आहे. शहरातील बोअरच्या पाण्याची पातळी घटली आहे, तर काही बोअर आटले आहेत.
नवीन वस्त्यांमध्ये नगर परिषदेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करून पाणी टंचाईवर मात केली जात असल्याचे पाणीपुरवठा सभापती प्राजक्ता श्रीकृष्ण कराड म्हणाल्या.

Web Title: For the first time in 53 years, water for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.