ईव्हीएम, पॅट मशीनचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:10 AM2019-01-13T00:10:45+5:302019-01-13T00:11:48+5:30

मतदारांना ईव्हीएमव्हीपॅट मशिनची माहिती व्हावी, तसेच त्याची हाताळणी व मतदान कसे करावे, या बाबत केज तालुक्यातील १३५ गावांतील २३४ मतदान केंद्रांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

EVM, Pat Machine demonstration | ईव्हीएम, पॅट मशीनचे प्रात्यक्षिक

ईव्हीएम, पॅट मशीनचे प्रात्यक्षिक

Next
ठळक मुद्देकेजमध्ये न्यायाधीश, वकिलांनी केले मतदानाचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : मतदारांना ईव्हीएमव्हीपॅट मशिनची माहिती व्हावी, तसेच त्याची हाताळणी व मतदान कसे करावे, या बाबत केज तालुक्यातील १३५ गावांतील २३४ मतदान केंद्रांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून केज न्यायालयात याबाबतचे प्रात्यक्षिक न्यायाधीश, वकिलांना देण्यात आले. यावेळी महसूल व निवडणूक विभागाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुका पार्श्वभूमीवर मतदारांना ईव्हीएम पॅट मशीनची ओळख व त्याची हाताळणीसह मतदान कसे करावे, याची माहिती अवगत करणे हा या मागचा हेतू आहे. तसेच मतदारांनी सदरील या मतदान केल्यानंतर अवघ्या सात सेकंदांत मतदान कोणास केले आहे, हे त्याला दिसणार आहे. या मशिनची माहिती मतदारांना व्हावी यासाठी २१ डिसेंबर २०१८ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्यासह न्यायाधीश, वकील मंडळी यांची उपस्थिती होती.

Web Title: EVM, Pat Machine demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.