बीड जिल्ह्यात सावट दुष्काळाचे, उत्साह दिवाळीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:36 PM2018-11-07T23:36:25+5:302018-11-07T23:36:45+5:30

जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दिवाळीवर दुष्काळाचे सावट जाणवले. तरीही उत्साहाने दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. बाजारपेठेत दोन दिवसांची आणि तीही चाकरमान्यांची दिवाळी पहायला मिळाली.

Due to drought, enthusiasm in Beed district, Diwali | बीड जिल्ह्यात सावट दुष्काळाचे, उत्साह दिवाळीचा

बीड जिल्ह्यात सावट दुष्काळाचे, उत्साह दिवाळीचा

Next
ठळक मुद्देचाकरमान्यांचीच दिवाळी : दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात बीड शहरातील नागरिकांचीच वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दिवाळीवर दुष्काळाचे सावट जाणवले. तरीही उत्साहाने दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. बाजारपेठेत दोन दिवसांची आणि तीही चाकरमान्यांची दिवाळी पहायला मिळाली.
बीड जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला. तोही अनियमित झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आॅक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होते. मात्र यंदा बोंडअळीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. पहिल्या वेचणीतच झाडा झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. त्याचबरोबर पुरेशा पावसाअभावी इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. परिणामी ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आॅक्टोबरपासूनच सुरु झाले. पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा पैसा राहिला नाही. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील व्यापार- व्यवहारावर झाला. त्याचबरोबर दिवाळीच्या कालावधीत शहरातील बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला. त्यामुळे शहरी भागात चाकरमान्यांची दिवाळी होऊ शकली. दरवर्षीप्रमाणे ग्रामीण भागातील ग्राहक यंदा बाजारपेठेत दिसले नाही, त्यामुळे बाजारपेठेतही दोन दिवसच उत्साह जाणवला.
बुधवारी सकाळपासून बाजारात ग्राहकी होती. लक्ष्मी पूजनाचे साहित्य, फळे, सौंदर्य प्रसाधने, कपडे खरेदी करताना ग्राहक दिसून आले. परंतू खरेदीत ग्राहकांनी हात आखडता घेतल्याने उलाढालीवर परिणाम दिसून आला.
दसरा तसाच : दिवाळी अशी-तशीच
खरीप हंगाम संपताच दसºयाच्या वेळी शहरातील बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे दिवाळी चांगली जाईल अशी आशा व्यापाºयांना होती. परंतु, दोन दिवसच बाजारात वर्दळ आणि ग्राहकी होती.
वाहन बाजारातही मागणी घटली
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातून किरकोळ अपवाद वगळता प्रतिसाद नव्हता. नोकरदारांकडूनच वाहन खरेदी नोंदणी झाली, मात्र ते प्रमाणही दरवर्षीच्या तुलनेत कमीच राहिल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.
फटाका बाजारातही अनुत्साह
फटाका बाजारातही अनुत्साह दिसून आला. ८० दुकाने यंदा होती. मंगळवार आणि बुधवारीच बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली.

Web Title: Due to drought, enthusiasm in Beed district, Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.