बीडमध्ये खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे तोतया पोलिसाचा वृद्धेस  लुटण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 07:19 PM2019-03-19T19:19:20+5:302019-03-19T19:19:52+5:30

खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा टळला.

Due to the alertness of the real police in Beed, the attempt to rob the elderly women by fake policeman was unsuccessful | बीडमध्ये खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे तोतया पोलिसाचा वृद्धेस  लुटण्याचा प्रयत्न फसला

बीडमध्ये खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे तोतया पोलिसाचा वृद्धेस  लुटण्याचा प्रयत्न फसला

googlenewsNext

बीड : पुढे तपासणी चालू आहे, तुमच्या हातातील अंगठ्या आमच्याकडे द्या, आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी देऊन एका वृद्धाची फसवणूक केली जात होती. मात्र खऱ्या पोलिसामुळे हा प्रयत्न फसला. वृद्धाच्या हातातील अंगठी काढताच त्यांनी झडप घातली. मात्र त्यांना चकवा देत हे चोरटे पसार झाले. खऱ्या पोलिसाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा टळला. चोर-पोलिसचा हा थरार मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता नगर रोडवरील चंपावती शाळेसमारे घडला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोह नरेंद्र बांगर हे चंपावती शाळेसमोरून मुलाला  खाऊ आणण्यासाठी जात होते. एवढ्यात त्यांना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांची हालचाल संशयास्पद वाटली. ते बाजुलाच दबा धरून बसले. या तरूणांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दुचाकी उभा केली. एक तिथेच उतरला तर दुसरा दुचाकी घेऊन शाळेसमोर गेला. सा.बां.समोरील एकाने एका वृद्धास बतावणी देत समोर पोलिसकडे चला, असे म्हणत हाताला धरले आणि दुसऱ्याकडे नेले. तेथे वृद्धाच्या हातातील अंगठी काढून घेताच बाजुला असलेल्या बांगर यांनी झडप घातली. मात्र एकाने त्याना हिसका देत पळ काढला. ‘पकडा पकडा, चोर चोर’ असे म्हणत त्यांनी नागरिकांना जमा केले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. एक चोरटा बालेपीरकडे तर दुसरा नगर नाक्याकडे पळाला.

दरम्यान, याची माहिती बांगर यांनी तात्काळ नियंत्रण कक्षात दिली. त्यानंतर पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस यांनी धाव घेत परिसर पिंजून काढला. मात्र चोरटे सापडले नाहीत. घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी, लायसन्स आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूकीपासून वृद्ध बचावले शिवाय एक घटनाही टळली.

दोघेही अट्टल गुन्हेगार
सापडलेल्या आधार कार्डवरून ते श्रीरामपुर येथील असल्याचे समजले. तेथील पोलिसांना विचारणा केली असता हे दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे समजले. यातील एक आरोपी हा दोन वर्षांपासून श्रीरामपूर पोलिसांना हवा आहे. 

अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा
पोलीस किंवा इतर कारणे सांगून आपल्याशी कोणी जवळीक साधत असेल तर सावध रहा. संशयास्पद व्यक्ती वाटल्यास तात्काळ सजग होऊन पोलिसांना संपर्क करा. बतावणी, भुलथापांना बळी पडू नका. नागरिकांनी स्वत: सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांनाही सतर्क करावे. पळालेल्या दोन्ही चोरट्यांना लवकरच जेरबंद करू, त्यादृष्टीने पथके तपास करीत आहेत.
- घनश्याम पाळवदे, पोनि स्थानिक गुन्हे शाखा, बीड

Web Title: Due to the alertness of the real police in Beed, the attempt to rob the elderly women by fake policeman was unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.