मोठी बातमी: देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

By संजय तिपाले | Published: November 30, 2022 11:34 AM2022-11-30T11:34:21+5:302022-11-30T11:35:25+5:30

बीडमध्ये खळबळ: आ. सुरेश धस यांच्या पत्नी, भावाचाही आरोपींत समावेश आहे

Big News: BJP MLA Suresh Dhas booked in Devasthan land scam in Beed | मोठी बातमी: देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

मोठी बातमी: देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

Next

बीड : आष्टी तालुक्यातील कथितआठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी २९ नोव्हेंबरला मोठी घडामोड घडली. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार  प्रतिबंध अधिनियम १९८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 जिल्ह्यातील हिंदू  देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लंचला;उचपात प्रतिबंधक विभागाला दि होते. खाडे यांनी आपल्या  तक्रारीत आ. सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आ. सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आ.सुरेश  धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार २९ रोजी  कलम १३(१)(अ) (ब),१३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८सह कलम- ४२०,४६५,४६७,४६८,४७१,१२० (ब)१०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.

आमदार धसांवर असा आहे ठपका
आमदार धस यांनीपदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी  कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवला आहे.

Web Title: Big News: BJP MLA Suresh Dhas booked in Devasthan land scam in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.