मोठा मासा पकडला, ठेवी परत कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:24 AM2018-08-26T00:24:52+5:302018-08-26T00:25:34+5:30

शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास शनिवारी पहाटे पुण्यात अटक केल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Big fish caught, when will the deposit get back? | मोठा मासा पकडला, ठेवी परत कधी मिळणार ?

मोठा मासा पकडला, ठेवी परत कधी मिळणार ?

Next
ठळक मुद्दे‘शुभकल्याण’चा दिलीप आपेट जेरबंद : जिल्हाभरात १० गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास शनिवारी पहाटे पुण्यात अटक केल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ४२० ठेवीदारांना गंडा घातला आहे. बीड, अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. लोकमतने या प्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने पोलीस तपासाला वेग आला आहे.
मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव
दरम्यान जुलैमध्ये गेवराईच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना महाराष्टÑ ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत प्रस्ताव पाठविला. या पत्राचा आधार घेऊन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गृहविभागाच्या सचिवांना पत्र पाठविले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील यांनी दिलेल्या संस्थापक, चेअरमन यांची मालमत्ता जप्त करावी असे त्यात नमूद होते. ३३ आॅगस्ट रोजी छाटा मासा गळाला लागल्यानंतर दोनच दिवसात मोठा मासा पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. इतर आरोपींनीही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोठा मासा पकडला आता आपल्या ठेवी कधी मिळतील याची प्रतीक्षा ठेवीदारांना आहे.
दिवसभर प्रतीक्षा : सायंकाळी अटक
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, उपनिरीक्षक योगेश खटके, कर्मचारी संजय पवार, अशोक ननवरे, अमोल कदम, राम बहिरवाळ, नितीन वडमारे, राजू पठाण, गंधारी मस्के, आयोध्या उबाळे यांच्या पथकाने शुक्रवारी पुणे येथे सापळा रचून दिलीप आपेट यास ताब्यात घेतले व पहाटे अटकेची कार्यवाही केली.
गेवराईत १३ जणांवर गुन्हा
गेवराई येथील पोलीस ठाण्यात दोन महिन्यापूर्वी शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या अध्यक्षासह संचालक अशा एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात १०० पेक्षा जास्त ठेवीदारांचे तब्बल १ कोटी १७ लाख रूपये अडकले आहेत.
माजलगावात ९०० खातेदार
माजलगाव : माजलगाव येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये ९०० खातेदारांचे जवळपास सहा कोटी रुपये अडकले. शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दीड वर्षांपासून सदरील शाखा बंद असल्याने ठेवीदार त्रस्त आहेत.
परळीत ११२ ठेवीदार
परळी : परळी तालुक्यातील ११२ ठेवीदारांना ३ कोटी ८४ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त वीज कर्मचारी शंकर राऊत यांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर ठाण्यात ११ संचालकांविरुद्ध २६ जानेवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: Big fish caught, when will the deposit get back?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.