बीडमध्ये नुतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी रूजू

By अनिल भंडारी | Published: February 29, 2024 03:54 PM2024-02-29T15:54:49+5:302024-02-29T15:54:49+5:30

राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन शाखा ‘गट अ’ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.  

Bhagwan Phulari, the new education officer in Beed | बीडमध्ये नुतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी रूजू

बीडमध्ये नुतन शिक्षणाधिकारी भगवान फुलारी रूजू

बीड : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेत प्राथ‌मिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार भगवान अंबादास फुलारी यांनी गुरूवारी  स्वीकारला. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. 

राज्याच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन शाखा ‘गट अ’ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.  त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील योजना विभागाचे शिक्षणाधिकारी फुलारी यांची बीड येथे नियुक्ती करण्यात आली होती. २६ फेब्रुवारी रोजी राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांची बीड येथे नियुक्त केली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी लाेकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Bhagwan Phulari, the new education officer in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.