तुमच्या केसांचा सतत गुंता होतो का? 'हे' उपाय करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:37 PM2019-01-30T16:37:15+5:302019-01-30T16:38:15+5:30

आपल्यापैकी अनेक लोकांना केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक समस्या म्हणजे, केसांमध्ये होणारा गुंता. याची अनेक कारणं असतात. जसं की, वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स, सतत आयनिंग किंवा ड्रायरचा करण्यात येणारा वापर, याशिवाय इतर हेअर स्टायलर टूल्स.

Various ways to prevent your hair from tangling | तुमच्या केसांचा सतत गुंता होतो का? 'हे' उपाय करतील मदत

तुमच्या केसांचा सतत गुंता होतो का? 'हे' उपाय करतील मदत

googlenewsNext

आपल्यापैकी अनेक लोकांना केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक समस्या म्हणजे, केसांमध्ये होणारा गुंता. याची अनेक कारणं असतात. जसं की, वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स, सतत आयनिंग किंवा ड्रायरचा करण्यात येणारा वापर, याशिवाय इतर हेअर स्टायलर टूल्स. या कारणांमुळे केसांच्या गाठी तयार होतात आणि केसांचा गुंता तयार होतो. हा गुंता सोडवताना केस तुटतात एवढचं नव्हे तर केसांचा लूकही खराब दिसतो. केस लहान असो किंवा लांब. केसांमध्ये गुंता हा होतोच. दरम्यान केस लांब असतील तर त्यांची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. पण त्याचबरोबर लांब केसांचा गुंताही अधिक होतो. तसं पाहायला गेलं तर केसांचा गुंता सोडवता येतो पण असं करताना खूप केसं तुटतात. त्यापेक्षा तुम्ही केसांचा गुंताच होऊ देऊ नका. जाणून घेऊया केस गळण्यापासून रोखण्यासाठी आणि केसांचा गुंता होऊ न देण्यासाठी फायदेशीर ठरणारे काही उपाय...

केस दररोज धुवू नका

दररोज केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर केल्याने फॉलिकल्समध्ये असलेलं नैसर्गिक तेल कमी होतं. ज्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी होते तसेच केसही कोरडे होतात. केसांमध्ये असलेले नैसर्गिक तेल केस मुलायम ठेवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे केसांचा गुंता होत नाही. 

केस जास्त वेळ मोकळे सोडू नका

जर तुमचे केस जास्त गळत असतील तर त्यांना मोकळे सोडू नका. दिवसातून 2 ते 3 वेळा कंगव्याच्या सहाय्याने केस व्यवस्थित विंचरा आणि पोनी टेल बांधा. यामुळे केसांचा गुंता होणार नाही. 

हेअर मास्कचा वापर करा

केसांच्या ट्रेसिसला मुलायम ठेवण्यासाठी हेअर मास्क एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे केसांना पोषण मिळण्यासही मदत होते. तुम्ही बाजारातून काही चांगले आणि केसांसाठी लाभदायक असे हे्अर मास्क आणू शकता. जर तुम्हाला बाजारातील उत्पादनांचा वापर करण्याची इच्छा नसेल तर घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही घरीच हे्अर मास्क तयार करू शकता. त्यासाठी नारळाचं तेल, केळी एकत्र करून तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता. 

तेलाचा वापर

तुम्ही स्प्रे, सीरम आणि क्रिम असा गोष्टींचा वापर करू शकता. तुमच्या केसांचा प्रकार ओळखून तुम्ही त्यांचा वापर करू शकता. त्यामुळे तुमचे केस गळण्यापासून रोखता येऊ शकतात. जर तुम्ही काही घरगुती उत्पादनांचा वापर करण्याच्या विचारात आहात, तर तुम्ही नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. 

Web Title: Various ways to prevent your hair from tangling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.