केसांसाठी रामबाण ठरतं लिंबू आणि खोबऱ्याचं तेल; असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 05:08 PM2019-05-22T17:08:06+5:302019-05-22T17:12:38+5:30

कोरडे आणि रूक्ष केस, केस गळणं आणि कोंडा यांसारख्या समस्यांमुळे जवळपास सगळेचं वैतगलेले आहेत. अनेकजण तर केस गळण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हैराण आहेत.

Use lemon and coconut oil for hair know benefits | केसांसाठी रामबाण ठरतं लिंबू आणि खोबऱ्याचं तेल; असा करा वापर

केसांसाठी रामबाण ठरतं लिंबू आणि खोबऱ्याचं तेल; असा करा वापर

googlenewsNext

(Image Credit : LooLoo Herbal)

कोरडे आणि रूक्ष केस, केस गळणं आणि कोंडा यांसारख्या समस्यांमुळे जवळपास सगळेचं वैतगलेले आहेत. अनेकजण तर केस गळण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हैराण आहेत. केसांच्या या सर्व समस्यांना सूर्याची प्रखर किरणं, प्रदूषण आणि धूळ-माती जबाबदार आहे. याव्यतिरिक्त आपला आहार आणि अनियमित जीवनशैलीचा देखील यावर परिणाम होत असतो. 

केसांना सुंदर लूक देण्यासाठी आणि त्यांना हेल्दी करण्यासाठी आपण हेअर स्पापासून हेअर ट्रिटमेंटपर्यंत सगळ्याचा आधार घेतो. तसेच अनेक घरगुती उपायही करतो. परंतु काही खास फायदा होत नाही. परंतु काही असे पदार्थ आहेत ज्या केसांना मजबुती देण्यासोबतच त्यांच्या वाढिसाठीही मदत करतात. हे दोन पदार्थ म्हणजे, लिंबू आणि खोबऱ्याचं तेल. 

- लिंबू आणि खोबऱ्याच्या तेलाच्या फाद्यांबाबत आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेलच. जेव्हा केसांसाठी या दोन्ही गोष्टी एकत्र करून वापरल्या जातात. त्यावेळी त्याचे अनेक फायदे होतात. खोबऱ्याचं तेल लिंबाचा रस एकत्र करून लावल्याने अनेक फायदे होतात. जाणून घेऊया काही फायद्यांबाबत...

- नारळाच्या तेलामध्ये लिंबू एकत्र करून केसांच्या मुळाशी मसाज करा. मालिशे केल्याने मिश्रण केसांच्या मुळाशी पोहोचतं आणि त्यांना मजबुती मिळते. एवढचं नाही तर हे केस गळण्यापासून रोखण्याचं कामही करतात. लिंबू आणि खोबऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि मिनरल्स असतात. जे केसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. 

- खोबऱ्याच्या तेलानमध्ये व्हिटॅमिन के आणि ई असंत. जे हेअर फॉलिकल्स हेल्दी ठेवतात आणि डॅन्ड्रफही दूर करतात. तसेच लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त अॅन्टी-फंगल प्रॉपर्टिज असतात. ज्या स्काल्प स्वच्छ ठेवण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त हे केस कमी वयातच पांढरे होण्यासाठीही कारणीभूत ठरतात. 

- लिंबामध्ये लिमोनिन नावाचं एक तत्व असतं. जे कोरड्या आणि निस्तेज केसांना चमक देण्यासाठी मदत करतात. तसेच केसांची चमकही वाढवतात. लिंबाचा एक उत्तम एक्सफोलिएटरही आहे आणि स्काल्पसाठी कोणत्याही रामबाण उपायापेक्षा कमी नाही. 

- जर तुमचे केस पातळ किंवा हलके असतील तर खोबऱ्याच्या तेलामध्ये लिंबाचा रस एकत्र करून मालिश करा. यामुळे केसांना फायदा होतो. दररज मसाज कल्याने काही दिवसांमध्येच केसांमध्ये वॉल्यूम दिसू लागतो. 

- तुम्ही बजारातील कोणत्याही कंडिशनरचा वापर करा. परंतु लिंबू आणि खोबऱ्याचं तेल उत्तम कंडिशनर आहे. या दोन्ही पदार्थांच्या वापराने केस मुलायम होतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Use lemon and coconut oil for hair know benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.