चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:07 PM2019-03-15T12:07:35+5:302019-03-15T12:15:13+5:30

अ‍ॅलोवेराला वंडर प्लांट असंही म्हटलं जातं. याचे त्वचेला होणारे आणि आरोग्याला होणारे फायदे आता बहुतेकांना माहीत आहेत.

Tricks to apply aloe vera on face | चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

googlenewsNext

अ‍ॅलोवेराला वंडर प्लांट असंही म्हटलं जातं. याचे त्वचेला होणारे आणि आरोग्याला होणारे फायदे आता बहुतेकांना माहीत आहेत. बाजारातून याचे वेगवेगळे प्रॉडक्ट अनेकजण वापरू लागले आहेत. अ‍ॅलोवेराचे खासकरून त्वचेला फार फायदे होतात. यातील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्त्वांमुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या सहज दूर केल्या जातात. पण हे चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धतही माहीत असणे गरजेचे आहे.

अ‍ॅलोवेराचा चेहऱ्यावर वापर वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो. हे सनबर्न, मॉइश्चरायझर, मेकअप रिमुव्हर, अ‍ॅंटी-एजिंग जेल, स्क्रब, आयब्रो जेलसहीत वेगवेगळ्याप्रकारे वापरलं जाऊ शकतं. मात्र याचा वापर कसा करावा हे जर माहीत असेल तर त्याचा फायदा अधिक दिसू शकतो. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ‍ॅलोवेरा जेल तुम्ही घरीही तयार करू शकता. 

- जर तुम्ही अ‍ॅलोवेराचा वापर सनबर्नसाठी करत असाल तर अ‍ॅलोवेरा जेल तुम्ही काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यात काही थेंड गुलाबजल मिश्रित करून ठेवा. रोज रात्री हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि झोपा. 

(Image Credit : Beauty oneHOWTO)

- डेड स्कीन दूर करण्यासाठी ऐलोव्हेरा जेल लावण्यासाठी फेसवॉश आणि पाण्याने त्वचा चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा जेलची हलकी परत लावा. नंतर कॉटनचा भीजलेला कापड घेऊन हलक्या हाताने स्क्रब करत जेल पुसून टाका.

- अ‍ॅंटी-एजिंग जेल म्हणून अ‍ॅलोवेराचा वापर करत असाल तर यात व्हिटॅमिन ई चं तेल आणि व्हिटॅमिन सी चं पावडर मिश्रित करून लावा. याने फायदा अधिक बघायला मिळेल. 

(Image Credit : beautybyearth.com)

- मेकअप हटवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. त्याजागी कॉटनवर अ‍ॅलोवेरा जेल घेऊन मेकअप हलक्या हाताने दूर करा.

पुरूषांनी असा करा अ‍ॅलोवेराचा वापर

अनेक पुरुषांची त्वचा शेव्ह केल्यानंतरही ड्राय होते. अशा वेळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल, एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा. असे रोज केल्यास त्वचा मुलायम व टवटवीत राहील. 

* ज्यांची त्वचा सामान्य आहे त्यांना जास्त काही करण्याची गरज नाही. एक चमचा गुलाबजल, एक चमचा दही, एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर व एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने तुमची त्वचा चमकायला लागेल. 

* तेलकट त्वचा असेल तर एक चमचा काकडीचा रस, एक चमचा गुलाबजल, एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ मिनिटे त्वचेवर लावून ठेवा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Tricks to apply aloe vera on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.