नखांचं आरोग्य राखण्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 07:29 PM2019-01-24T19:29:01+5:302019-01-24T19:35:31+5:30

अनेकजण आपल्या नखांना जपतात, त्यांची काळजी घेतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो.

Tips to care nails and color nails by nail polish | नखांचं आरोग्य राखण्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयुक्त!

नखांचं आरोग्य राखण्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी 'या' टिप्स ठरतील उपयुक्त!

Next

अनेकजण आपल्या नखांना जपतात, त्यांची काळजी घेतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो. सध्या नेल आर्टचा ट्रेन्ड आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळ अनेक महिलांची इच्छा असते की, आपलीही नखं लांब आणि आकर्षक असावी तसेच आपणही नेल आर्ट करावं. पण अनेकदा आपलं नखांकडे दुर्लक्ष होतं. कधी कधी तर कामाच्या गडबडीमध्ये इच्छा असूनही नखांची काळजी घेणं शक्य होत नाही. अनेकांना तर नखांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहितचं नसतं. आज आम्ही तुम्हाला नखांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती टिप्स  सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही नखं लांब आणि आकर्षक करण्यासोबतच त्यांची काळजी घेऊ शकता. तसेच नेलपेंट अप्लाय केल्यानंतर स्मूद लूक मिळण्यासही मदत होईल. 

1. आठवड्यातून एकदा तरी हातांना मालिश करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये वाढ होण्यास मदत होते. फक्त हातांनाच नाही तर नखांनाही मालिश करणं आवश्यक असतं. त्यामुळे नखांच्या वाढिसोबतच नखं आकर्षक होण्यासही मदत होतं. 

2. नेल पॉलिश अधिकाधिक वेळ नखांवर टिकवून ठेवण्यासाठी नेल पॉलिश लावल्यानंतर ती व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतर बर्फाच्या पाण्यामध्ये 30 सेकंदांसाठी ठेवा. 

3. नेल पॉलिश जेव्हा नखांवरून निघू लागेल त्यावेळी टचअप न करता. नेलपेंट रिम्हूवर वापरून ती काढून टाका आणि पुन्हा नेटपेंट नव्याने लावा. त्याच नेलपेंटवर टचअप केल्याने नखांचा लूक बिघडू शकतो. 

4. आपल्या नखांना मजबूत ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करा. यासाठी अर्धा कप सफरचंदाचं व्हिनेगर आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. त्यामध्ये 10 मिनिटांपर्यंत हात बुडवून ठेवा. त्यानंतर 5 मिनिटं हलक्या हाताने नखांवर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ धुवून टाका. 

5. नखांची देखभाल करण्यासाठी नारळाचं तेल वापरा नारळाचं तेल नखांसाठी फार फायदेशीर ठरतं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल नखांना लावून मसाज केल्यानंतर नखं मजबूत होण्यास मदत होते. तसचे नेलपेंट लावल्यानंत स्मूद लूक मिळण्यास मदत होते. 

6. जर तुम्ही नेल आर्ट करण्याचा विचार करत असाल तर डार्क कलरच्या नेलपेंटचे दोन कोट लावा. व्यवस्थित सुकल्यानंतर टूथपिकच्या मदतीने नखांवर डिझाइन करा. त्यामुळे नेल आर्टच्या डिझाइनने नखांना त्रास होणार नाही. 

7. ऑलिव्ह ऑइल नखांच्या मजबूतीसाठी फार फायदेशीर असतं. लिंबाच्या रसामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल मिक्स करून नखांना मसाज करा. यामुळे नखं चमकदर होण्यास मदत होईल. 

Web Title: Tips to care nails and color nails by nail polish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.