त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 04:53 PM2019-04-11T16:53:05+5:302019-04-11T16:54:34+5:30

जेव्हाही आपल्या चेहऱ्यावर धूळ-माती जमा होते, अशावेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी फेसवॉश किंवा साबणाचा वापर करतो.

These natural things use for glowing skin | त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत

त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत

जेव्हाही आपल्या चेहऱ्यावर धूळ-माती जमा होते, अशावेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी फेसवॉश किंवा साबणाचा वापर करतो. जर तुम्ही चेहारा धुण्यासाठी सतत केमिकल असलेला साबण किवा फेसवॉश वापरला तर आपल्या त्वचेला नुकसान पोहोचू शकतं. ड्राय स्किन आणि चेहऱ्यावर आलेले रॅशजसारखे अनेक स्किन प्रॉब्लेम्स हे फेसवॉश वापरल्यानंतर समोर येत असतात. सर्वात उत्तम आणि स्वस्त पद्धत म्हणजे, तुम्ही घरीच नॅचरल फेसवॉश तयार करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला नुकसानही पोहोचणार नाही आणि चेहऱ्याची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. दररोज वापरण्यात येणाऱ्या या पदार्थांपासून तुम्ही घरीच अगदी सहज फेसवॉश तयार करू शकता. 

1. कोरफड 

त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये आढळून येणारे अॅन्टीऑक्सिडंट चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम होते आणि आवश्यक ते पोषण त्वचेला मिळतं. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून काही वेळ तसचं ठेवा. 

2. दही 

दही खाण्यासाठी जेवढं आरोग्यदायी असतं. तेवढचं आपल्या त्वचेसाठीही ते फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी दह्याचा वापर केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यवरील घाण दूर होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी एक चमचा दही घ्या आणि फेसवॉशप्रमाणे चेहऱ्यावर लावा. 

3. कच्चं दूध

दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासोबत दूध त्वचेसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. कच्च्या दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. जी त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर कॉटनच्या मदतीने कच्चं दूध लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यास मदत होते. 

4. गुलाब पाणी 

गुलाब पाणी आपला चेहरा स्वच्छ करण्यासोबतच त्वचा मुलायम करण्यासाठीही मदत होते. गुलाब पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा. सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. 

5. खोबऱ्याचं तेल 

चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी किंवा मेकअप काढून टाकण्यासाठी खोबऱ्याचं तेल अत्यंत फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल चेहऱ्यावर लावल्याने घाण आणि मेकअप स्वच्छ होण्यास मदत होते. खोबऱ्याचं तेल काही वेळ चेहऱ्यावर लावून त्याने मसाज करा. त्यानंतर कमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

6. लिंबू 

लिंबाच्या रसाचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा उजळवण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने 15 मिनिटं चेहरा स्वच्छ करणं गरजेचं असतं. 

7. काकडी 

चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरतं. काकडी किसून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. याव्यतिरिक्त काकडीच्या रसामध्ये दही एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांसाठी लावून त्यानंतर चेहरा स्वच्छ करा. 

8. टोमॅटो 

चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो. त्यासाठी एक चमचा दूध आणि लिंबाच्या रसामध्ये टोमॅटो एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. यानंतर तयार पेस्टचा वापर करून चेहरा स्वच्छ करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: These natural things use for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.