दातांसाठी हेल्दी ड्रिंक्स, हे ज्यूस प्याल तर दात आयुष्यभर राहतील निरोगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 11:13 AM2019-05-02T11:13:55+5:302019-05-02T11:15:43+5:30

दात मोत्यांसारखे चमकदार आणि निरोगी रहावे असं सर्वांनाच वाटत असतं. पण खरंच ब्रश करण्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी दातांच्या काळजीसाठी केल्या जातात का? हा प्रश्न आहे.

These healthy drinks to keep your teeth strong and healthy long life | दातांसाठी हेल्दी ड्रिंक्स, हे ज्यूस प्याल तर दात आयुष्यभर राहतील निरोगी!

दातांसाठी हेल्दी ड्रिंक्स, हे ज्यूस प्याल तर दात आयुष्यभर राहतील निरोगी!

Next

(Image Credit : Chocolate & Lipstick)

दात मोत्यांसारखे चमकदार आणि निरोगी रहावे असं सर्वांनाच वाटत असतं. पण खरंच ब्रश करण्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी दातांच्या काळजीसाठी केल्या जातात का? हा प्रश्न आहे. केवळ दिवसातून दोनदा ब्रश करून दात चांगले राहत नसतात. यासाठी तुम्हाला डाएटमध्येही बदल करावा लागतो. काही खाद्यपदार्थ दात निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असतात. ज्यात ज्यूस, ग्रीन टी, दूध इत्यादींचा समावेश करता येईल. 

(Image Credit : Sunleaf Medical)

जर तुमचे दात निरोगी नसतील आणि सडलेले असतील तर तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या होऊ शकते. दात निरोगी ठेवले नाही, त्यांची स्वच्छता केली नाही तर कॅव्हिटी, दात सडणे, तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात कमजोर होऊ हलणे या समस्या होतात. दात निरोगी ठेवण्यासाठी अशा पदार्थांचं सेवन करा ज्याने दातांना फायदा होईल. 

(Image Credit : Verywell Health)

१) दूध आवर्जून प्या - तुम्ही दूध पित नसाल तर प्यायला सुरूवात करा. कारण यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने दातांसोबतच हाडांना मजबूती मिळते. तसेच यातील प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मुळे दात निरोगी ठेवण्यास मदत मिळते. यातील प्रोटीनमध्ये केसिन नावाचा पदार्थ आढळतो, ज्याने दात सुरक्षित राहतात. 

(Image Credit : Sanford Health News)

२) पाणी कमी पिता का? - जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर ही सवय मोडा. पाणी ज्याप्रमाणे आपलं पोट साफ ठेवतं, त्याचप्रमाणे पाणी दातांसाठीही फायदेशीर असतं. पाण्याने दात स्वच्छ राहतात. आपण जितक्यांदा पाणी पितो तेवढ्या वेळा दातांना चिकटलेले पदार्थांचे कण शरीरात जातात. ज्यामुळे कॅव्हिटी आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनची समस्या होण्याचा धोका कमी असते. 

३) भाज्यांचा ज्यूस - जर तुम्ही भाज्यांचा ज्यूस सेवन करत नसाल तर लगेच सुरू करा किंवा तुम्ही एखाद्या भाजीचा सूप सेवन करू शकता. यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. केळं, पालक इत्यादींमध्ये शुगरचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे यांच्या ज्यूसचं सेवन केल्याने दात हेल्दी राहतात. तसेच कॅव्हिटीची समस्याही होत नाही. त्यामुळे दात मजबूत ठेवण्यासाठी भाज्यांचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरतं. 

(Image Credit : AllAbout-Japan.com)

४) ग्रीन टी - जर तुम्ही दुधाचा चहा घेत असाल तर त्याऐवजी ग्रीन टी सेवन करणे सुरू करा. ग्रीन टी मध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे लाळेचं प्रमाण वाढतं. ही लाळ दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. दात चांगले ठेवण्यासाठी ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस टाकून प्यायल्यास अधिक फायदा होता. 

५) संत्र्यांचा ज्यूस सुद्धा दातांसाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतो. यात व्हिटॅमिन डी चं सुद्धा प्रमाण भरपूर असतं. तसेच यातील नैसर्गिक अ‍ॅसिडमुळेही दातांना फायदा होता. 

Web Title: These healthy drinks to keep your teeth strong and healthy long life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.