तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 01:22 PM2019-05-11T13:22:28+5:302019-05-11T13:30:22+5:30

उन्हाळ्यात मेकअपच्या दृष्टीने वातावरण फारच संवेदनशील असतं. या दिवसात प्रखर उन्हामुळे चेहऱ्यांची रंगत हरवली जाते.

These beauty mistakes can spoil your look | तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान!

तुमच्या 'या' चुकांमुळे लूक तर बिघडेलच त्वचेचंही होईल नुकसान!

Next

उन्हाळ्यात मेकअपच्या दृष्टीने वातावरण फारच संवेदनशील असतं. या दिवसात प्रखर उन्हामुळे चेहऱ्यांची रंगत हरवली जाते. त्यामुळे इतर वातावरणाच्या तुलनेत या दिवसात चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. पण सोबतच त्या चुकाही टाळणे महत्त्वाचे आहे. ज्या सतत केल्या जातात. याने लूक आणि मेकअप दोन्ही खराब होऊ शकतात.

चुकीच्या पार्लरची निवड

(Image Credit : Metro Eve)

प्रत्येकालाच सुंदर दिसायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोक वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. अनेक महिला रेग्युलर पार्लरला फेऱ्या मारतात. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करूनही तुमच्या चेहऱ्याला रंगत मिळत नसेल तर तर याला छोट्या छोट्या चुका कारणीभूत असतात. याने चेहरा फ्रेश दिसत नाही. 

फेस वाइप्सचा वापर

(Image Credit : InTruBeauty)

सामान्यपणे मेकअप काढण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील धूळ-माती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही क्लेजिंग वाइप्सचा वापर करता. पण फेस वाइप्सचा जास्त वापर केल्याने त्वचेचा ओलावा नष्ट होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ लागते आणि त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. 

चेहरा घासणे

(Image Credit : BeBeautiful)

चेहऱ्याची त्वचा फार नाजूक असते. त्यामुळे चेहरा कधीही ताकदीने घासून घासून धुवू नये. अनेक लोक चेहऱा स्वच्छ करण्यासाठी जोरात घासतात आणि नखांचाही वापर करतात. याने त्वचेचं नुकसान होतं. त्यामुळे चेहरा नेहमी हलक्या हाताने फेसवॉशने धुवावा. तसेच दिवसातून कमीत कमी दोनदा चेहरा नक्की धुवावा.

मेकअप न काढणे

अनेक महिला दिवसभर मेकअप करून राहतात, ज्यामुळे त्वचेचं नुकसान होतं. त्यामुळे जेव्हाही मेकअप कराल ५ ते ६ तासांनी चेहऱ्यावरील मेकअप क्लीन करा. अनेकदा लोक मेकअप न काढताच झोपतात. पण असं करणं त्वचेचं नुकसान करणारं ठरतं. रात्री मेअकप न काढताच झोपलात तर त्वचेवर जळजळ, खाज, पुरळ येण्यासोबतच आणखीही काही त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. 

डेड स्कीनबाबत निष्काळजीपणा

(Image Credit : Murtela Cosmetics)

जर तुम्हाला वाटतं की, चेहरा अनेकदा धुतल्यावर चेहऱ्याची चांगली स्वच्छता होते, तर तुम्ही चुकताय. चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी स्क्रबिंग फार गरजेचं आहे. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन सहजपणे दूर होते. आणि त्वचेच्या स्वच्छतेसोबतच त्वचेला पोषणही मिळतं. तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी आठवड्यातून निदान दोनदा स्क्रबिंग करावं.

चुकीच्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर

(Image Credit : Reader's Digest)

आजकाल डुप्लिकेट कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स फार जास्त मिळतात. अनेक महिला पैसे वाचवण्याच्या नादात स्वस्त ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करतात. स्वस्त ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करणं चुक नाही, पण ते कसे असतील, त्यात काय असेल हे तपासावे. नाही तर त्वचेला नुकसान होतं. कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी एकदा टेस्ट नक्की करा. 

Web Title: These beauty mistakes can spoil your look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.