त्वचा उजळवण्यासाठी संत्र्याची सालीचा असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 11:49 AM2018-09-07T11:49:14+5:302018-09-07T11:51:19+5:30

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, त्वचेसाठी फळं फार आवश्यक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? सर्व फळांपैकी संत्री त्वचेसाठी फार फायदेशीर असतात.

skin benifits from Orange Peel | त्वचा उजळवण्यासाठी संत्र्याची सालीचा असा करा वापर!

त्वचा उजळवण्यासाठी संत्र्याची सालीचा असा करा वापर!

Next

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, त्वचेसाठी फळं फार आवश्यक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? सर्व फळांपैकी संत्री त्वचेसाठी फार फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जे त्वचेसाठी फार फायदेशीर असते. संत्र्यासोबतच सालही त्वचेसाठी फायदेशीर असते. संत्र्याच्या सालीमध्ये फोलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळतं.  त्याचप्रमाणे व्हिटॅमिन आणि खनिज तत्वही आढळून येतात. ही सर्व तत्व त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. बाजारातही संत्र्यापासून तयार करण्यात आलेली अनेक उत्पादनं आढळून येतात. परंतु तुम्ही घरच्या घरीही हे फेस पॅक तयार करून घेऊ शकता. 

याचा वापर करण्यासाठी संत्र्याच्या सालींचा वापर करण्यासाठी त्या साली सुकवून घ्या. त्यानंतर त्यांची बारिक पावडर करून डब्यामध्ये बंद करून ठेवा.

त्वचेवर उजाळा आणण्यासाठी दोन चमचे संत्र्याच्या सालींच्या पावडरमध्ये एक चमचा दही मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाक. असं केल्याने  चेहरा उजळवण्यास मदत होईल. 

त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. 

पिंम्पल्सची समस्या दूर करण्यासाठी संत्र्यांच्या सालींच्या पावडरमध्ये 3 चमचे दही, 3 चमचे मध आणि 3 चमचे गुलाब पाणी मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. 

Web Title: skin benifits from Orange Peel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.