'या' 5 नैसर्गिक उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:54 PM2018-07-03T16:54:00+5:302018-07-03T18:05:33+5:30

गर्भावस्थेनंतर अथवा व्यायाम केल्यानंतर अनेकांना स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात.

Natural remedies to remove stretch marks | 'या' 5 नैसर्गिक उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर!

'या' 5 नैसर्गिक उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या होईल दूर!

गर्भावस्थेनंतर अथवा व्यायाम केल्यानंतर अनेकांना स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. महिला आणि तरूणींना तर हमखास स्ट्रेच मार्क्सच्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात. या स्ट्रेच मार्क्समुळे अनेकदा हवे तसे कपडे घालणेही शक्य होत नाही. त्यासाठी काही नैसर्गिक उपायांची माहिती घेऊयात ज्यांमुळे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत होईल.

1. कोरफडीचा गर

कोरफड त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्वचेसंदर्भातील अनेक विकारांवर उपाय म्हणून कोरफडीकडे पाहिले जाते. कोरफड त्वचेच्या पेशी तयार करण्याचे काम करते. यामध्ये हिलिंग आणि अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. जे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यास मदत करतात. 

2. लिंबू

लिंबू हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते. लिंबामध्ये नॅचरल ब्लिचिंग तत्व असतात कारण यामध्ये सिट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जेव्हा याला स्ट्रेच मार्क्सवर लावण्यात येते, तेव्हा ते हळूहळू कमी होतात. 

3. खोबऱ्याचे तेल

खोबऱ्याचे तेल देखील स्ट्रेच मार्कसाठी अत्यंत गुणकारी आहे. दररोज स्ट्रेच मार्क्सवर खोबऱ्याच्या तेलाने मालिश केल्याने हळूहळू कमी होतात. खोबऱ्याच्या तेलमध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व मोठ्या प्रमाणात असतात. जे त्वचेमध्ये मुरतात आणि त्वचेच्या तक्रारी दूर करण्यास मदत करतात. 

4. हळद

हळदीमध्ये अॅन्टी ऑक्सिडेंट आणि त्वचेला उजळवणारी तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. दररोज हळदीचा वापर केल्याने स्ट्रेच मार्क्सची समस्या कमी होते. 


5. नियमित व्यायाम

नियमितपणे व्यायाम केल्याने शरिरासंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. लठ्ठपणामुळे देखील स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. त्यामुळे व्यायाम केल्याने लठ्ठपणावर निय़ंत्रण मिळवता येते आणि स्ट्रेच मार्क्सवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. 

Web Title: Natural remedies to remove stretch marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.