Men's Beauty Tips:पुरुषांनाही हवीय चमकदार त्वचा?; या टीप्स नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:26 PM2018-12-10T13:26:45+5:302018-12-10T13:27:00+5:30

महिलांपेक्षा पुरूष आपल्या त्वचेबाबत बेजबाबदार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच अनेकदा त्यांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या उद्धवल्यास अनेक महिला मेकअपचा आधार घेतात.

Men's Beauty Tips for glowing skin | Men's Beauty Tips:पुरुषांनाही हवीय चमकदार त्वचा?; या टीप्स नक्की वाचा

Men's Beauty Tips:पुरुषांनाही हवीय चमकदार त्वचा?; या टीप्स नक्की वाचा

Next

(Image Credit:campus-live.in)

महिलांपेक्षा पुरूष आपल्या त्वचेबाबत बेजबाबदार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच अनेकदा त्यांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या उद्धवल्यास अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. परंतु पुरूषांकडे मेकअपचाही पर्याय नसतो. त्यामुळे त्यांनी आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. हेल्दी आणि तजेलदार त्वचेसाठी पुरूषांनी या टिप्स फॉलो केल्या तर सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. 

त्वचेसाठी सीटीएम गरजेचं 

महिलांप्रमाणेच पुरूषांसाठीही सीटीएम म्हणजेचं क्लिंजिग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग करणं गरजेचं असतं. प्रदूषण, स्मोकिंग यांसारख्या कारणांमुळे चेहऱ्यावर फार धूल आणि घाण जमा होते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यासाठी क्लिंजिग करणं गरजेचं असतं. त्यासाठी माइल्ड क्लिंजरचा वापर करणं उपयोगी ठरतं. निस्तेज त्वचा, ब्लॅकहेड्स, ड्राय स्किन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी पुरूषांनी दररोज टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग करणं गरजेचं असतं. 

सनस्क्रिनचा वापर करा

अनेकजण सनस्क्रिन वापरणं टाळतात. परंतु त्वचेसाठी सनस्क्रिन फार गरजेचं असतं. अनेकांचा असा गैरसमज असतो की, थंडीमध्ये ऊन जास्त नसल्यामुळे सनस्क्रिन लावण्याची गरज नसेत. परंतु थोडसंही ऊन आपल्या त्वचेसाठी घातक ठरत असून त्यामुळे त्वचेचा टॅनिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे घरातून बाहेर पडताना 15 मिनिटांआधी सनस्क्रिन लावून बाहेर पडा.
 
एक्सफोलिएट करणं गरजेचं 

त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएशन गरजेचं असतं. हे त्वचेचं बॅक्टेरियांपासून रक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर तुम्ही तुमच्या त्वचेला स्क्रब केलं नाही तर त्यामुळे त्वचेच्या पोर्समध्ये ही सर्व घाण जमा होते. त्यामुळे पिंपल्सची समस्या होऊ शकते. त्वचा एक्सफोलिएट केल्याने त्वचा तजेलदार होण्यासोबतच मुलायम होण्यासही मदत होते. 

ओठांची काळजी 

थंडीमध्ये ओठांची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी एका चांगल्या क्वॉलिटीच्या लिप बामचा वापर करणं फायदेशीर ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लिप बाम लावल्यामुळे ओठ मुलायम आणि सुंदर राहण्यासाठी मदत होते. 

Web Title: Men's Beauty Tips for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.