रात्रीच्या पार्टीसाठी मेकअप करताय? या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 10:59 AM2018-10-12T10:59:53+5:302018-10-12T11:00:36+5:30

रात्री पार्टीला जाण्यासाठी तुम्हाला खास तयार व्हावं लागतं. पण अनेक महिलांना दिवसा आणि रात्रीचा मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच माहीत नसतं. चला

Makeup tips for a night out or a party | रात्रीच्या पार्टीसाठी मेकअप करताय? या गोष्टींची घ्या काळजी!

रात्रीच्या पार्टीसाठी मेकअप करताय? या गोष्टींची घ्या काळजी!

Next

(Image Credit : advanceeyecarecenter.com)

मेकअपने तुमच्या सौंदर्यात भर पडते. वेळ आणि निमित्ताच्या हिशोबाने मेकअपचा प्रकारही बदलतो. लग्न सोहळा असो वा एखादा इव्हेंट किंवा मित्राची पार्टी मेकअप जास्त रात्रीला करण्यात येतो. रात्री पार्टीला जाण्यासाठी तुम्हाला खास तयार व्हावं लागतं. पण अनेक महिलांना दिवसा आणि रात्रीचा मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच माहीत नसतं. चला आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या मेकअपसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. 

रात्री डार्क असावं मेकअप

जर तुम्ही रात्री एखाद्या इव्हेंट किंवा पार्टीसाठी करत असाल तर मेकअफ डार्क करा. दिवसा प्रकाश अधिक असतो, ज्यामुळे लाईट मेकअफ फेडअप होत नाही. पण रात्री आर्टिफिशिअल प्रकाशामुळे मेकअप हलकं वाटायला लागतं. मेकअप असं करा ज्यात तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स शार्प दिसतील. 

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी

सर्वात पहिल्या चेहऱ्यावर मॉश्चराईज लावा. त्यानंतर प्रायमर लावा. असे केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येणार. डाग लपवण्यासाठी स्किन टोनसोबत मिळता जुळता कंसीलर लावा. रात्री मेकअपमध्ये स्किनपेक्षा गर्द टोन वापरला जातो. 

रात्री डोळ्यांसाठी खास मेकअप

जर तुमचा फोकस तुमच्या डोळ्यांवर आहे तर शिमरिंग आयशॅडोचा वापर करा. मेकअपमध्ये डोळ्यांवर फोकस करताना हे बघा की, तुम्ही न्यूट्रल शेडचा लिप कलर वापरला आहे. सोबतच जर तुम्हाला मेकअप एखाद्या पार्टीसाठी करायचा असेल तर  स्मोकी आय लूक फार चांगला पर्याय ठरेल. यासाठी डोळ्यांना हायलाईट करण्यासाठी हायलायटरचा वापर करा. पापण्यांवर ब्राउन पॅलेटचा कोल शॅडो लावा. वॉटर प्रूफ मस्काराचे दोन कोट लावा.

ओठांसाठी लिप लायनर

ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठी लिपलायनरचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोणत्याही लिपशेडचा वापरही करु शकता. सॅसी रेड किंवा डीप प्लम लिपशेड तुमच्या ओठांना अधिक सुंदर करेल. यावर हलका ग्लॉस टच द्यावा. जेव्हा फोकस तुमच्या ओठांवर असतो तेव्हा डोळ्यांचं मेकअप कमीत कमी करा. केवळ थोडं काजळ आणि साधा मस्कारा वापरा. 

गालांचं मेकअप

तुमच्या गालांच्या अॅपल्सवर ब्लशचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक वाढते. रंगांना एकरुप करण्यासाठी फाऊंडेशनचा वापर करा. मानेवर फाऊंडेशन लावणे विसरु नका.

Web Title: Makeup tips for a night out or a party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.