आता पार्लरऐवजी घरच्या घरी केस सरळ करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 05:43 PM2018-08-15T17:43:30+5:302018-08-15T17:51:49+5:30

सध्या सर्व तरूणींमध्ये सरळ केसांचा ट्रेन्ड पहायला मिळतो. त्यासाठी पार्लरमध्ये बक्कळ पैसे खर्च करण्यात येतात. तसेच अनेक केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरण्यात येतात.

Make your hair straight without harm | आता पार्लरऐवजी घरच्या घरी केस सरळ करा!

आता पार्लरऐवजी घरच्या घरी केस सरळ करा!

googlenewsNext

सध्या सर्व तरूणींमध्ये सरळ केसांचा ट्रेन्ड पहायला मिळतो. त्यासाठी पार्लरमध्ये बक्कळ पैसे खर्च करण्यात येतात. तसेच अनेक केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स वापरण्यात येतात. त्यामुळे केसांचं फार नुकसान होतं. त्यामुळे केस गळणे, केसात कोंडा होणे, केस दुभंगणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही घरगुती उपायांनी घरच्या घरीच केस स्ट्रेट करता येतात. जाणून घेऊयात अशा काही उपायांबाबत ज्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी केस सरळ करू शकता. 

1. जर तुम्हाला तुमचे केस सरळ करायचे असतील तर मध आणि दुधाचा वापर करा. त्यासाठी एक कप दुधामध्ये दोन मोठे चमचे मध आणि थोडं स्ट्रॉबेरीची पेस्ट मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट केसांवर लावा. 2 तासांनी केस शॅम्पूने धुवून टाका. 

2. मुलतानी माती आणि तांदळाचं पीठ वापरून तुम्ही घरच्या घरी केस सरळ करू शकता. त्यासाठी एक कप मुलतानी मातीमध्ये 5 चमचे तांदळाचे पीठ आणि एक अंड टाकून नीट मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावा. सुकल्यानंतर केस धुवून टाका. हा पॅक केसांना लावण्याआधी केसांना तेल लावा. 

3. दोन अंडी चांगली फेटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. त्यानंतर  1 तासासाठी केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पून धुवून टाका. 

4. नारळाच्या दूधामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट तयार करा. एका दिवसासाठी ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर ही पेस्ट केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर एक टॉवेल गरम पाण्यामध्ये भिजवून केसांना गुंडाळून ठएवा. 1 तासाने केस थंड पाण्याने धुवा. 

टिप : वरील टिप्स वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण यामध्ये वापरण्यात आलेल्या पदार्थांची काही लोकांना अॅलर्जी असते. 

Web Title: Make your hair straight without harm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.