ट्रिप प्लॅन करत असाल तर स्किन केयरसाठी 'या' टिप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 04:28 PM2019-04-13T16:28:31+5:302019-04-13T16:37:53+5:30

मुलांच्या परीक्षा संपल्या असून तुम्हीही कुटुंबासोबत फिरण्यासाठी खास प्लॅन तयार केला असेल. पण वातावरणातील उकाडा वाढला असून आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टी तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असतं.

Know how to take care of skin while travelling | ट्रिप प्लॅन करत असाल तर स्किन केयरसाठी 'या' टिप्स फॉलो करा

ट्रिप प्लॅन करत असाल तर स्किन केयरसाठी 'या' टिप्स फॉलो करा

Next

मुलांच्या परीक्षा संपल्या असून तुम्हीही कुटुंबासोबत फिरण्यासाठी खास प्लॅन तयार केला असेल. पण वातावरणातील उकाडा वाढला असून आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टी तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असतं. परंतु तुम्हाला माहित आहे का? ट्रॅवलिंग करताना तुम्हाला त्वचेची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया तुम्हाला प्रवासादरम्यान उपयोगी ठरणाऱ्या टिप्सबाबत...

सैल कपडे परिधान करा 

कुठेही फिरायला जात असाल तर सर्वात आवश्यक आहे की, तुम्ही तुम्या कपड्यांवर लक्ष द्या. फॅशन फॉलो करण्याच्या नादात तुम्ही स्वतःच कम्फर्ट विसरू नका. फक्त एवढचं नाही तर उन्हाळ्यामध्ये फिरताना सैल कपडे वेअर करा. जास्त घट्ट कपडे वेअर केल्याने उठण्या-बसण्यासोबतच इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शक्यतो फिरण्यासाठी जात असाल तेव्हा सैल कपडे परिधान करा. 

भरपूर पाणी प्या 

उन्हाळ्यामध्ये फिरायला जाताना शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून भरपूर पाणी प्या. आपल्यासोबत पाण्याची बाटली, ग्लूकोज यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. जर तुम्ही डोंगराळ भागात फिरण्यासाठी जाणार असाल आणि उलट्यांचा त्रास झाला तरी पाणी पिणं बंद करू नका. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहा. 

सनस्क्रिन लावणं विसरू नका 

फक्त महिलांनीच आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं असं नाही. उन्हाळ्यामध्ये प्रवासादरम्यान सर्वात आवश्यक आहे तुमच्या त्वचेची काळजी घेणं. इतर गोष्टींसोबतच तुमच्याकडे सनस्क्रिन असणं आवश्यक आहे. अशातच प्रयत्न करा की, उन्हामध्ये निघण्याच्या अर्धा तास आधीच सनस्क्रिन लावा. 

गॉगल्स आणि हॅट गरजेची

उन्हाळ्यामध्ये फिरण्याचा प्लॅन केला असेल तर स्वतःसोबत सनग्लास आणि हॅट नक्की ठेवा. प्रखर उन्हामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी हॅट आणि गॉगल्सचा वापर करा. जर तुम्ही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी जाणार असाल तर सनग्लासेसचा वापर करण्यासाठी विसरू नका. या दोन्ही वस्तू तुमचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी मदत करतील. तसेच तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल. 

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणं टाळा

जास्त उन्हामध्ये फिरण्यासाठी जाणार असाल तर स्ट्रीट फूड खाणं शक्यतो टाळा. बाहेर मिळणारे पदार्थ अनेकदा खराब तेलामध्ये तयार करण्यात येतात. यामुळे कदाचित पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर खाण्याची इच्छा झालीच तर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्येच खा. 

सोबत औषधं ठेवा

प्रवास कसाही असो आपल्यासोबत काही औषधं नक्की ठेवा. जसं ताप, उलट्या आणि डोकेदुखी यांवर असणारी औषधं. जर तुमच्यासोबत मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी काही खास औषधं सोबत ठेवण्यास विसरू नका. 

Web Title: Know how to take care of skin while travelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.