स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:27 PM2019-06-15T12:27:59+5:302019-06-15T12:29:51+5:30

ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर, त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही ग्रीन टी मदत करतो.

Green tea face pack for all type skin | स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक

स्किन टाइप कोणताही असो; सर्व प्रॉब्लेम्स दूर करतील 'हे' ग्रीन-टी फेसपॅक

Next

ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर, त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही ग्रीन टी मदत करतो. याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करून त्वचेचं सौंदर्य वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला ग्रीन टीचा वापर करून काही फेसपॅक घरीच तयार करता येऊ शकतात. जाणून घेऊया घरच्या घरी ग्रीन टीचा वापर करून फेसपॅक तयार करण्याच्या सोप्या पद्धती... 

ऑयली स्किननसाठी ग्रीन टी फेसपॅक 

ऑयली स्किनसाठी ग्रीन टी वरदान ठरतं. जर तुमची स्किन ऑयली असेल तर ग्रीन टी चा फेस पॅक नक्की ट्राय करा. हे स्किन क्लिन करण्यासाठी मदत करत असून स्किनवरील डाग दूर करण्यासाठीही मदत करतं. 

नॉर्मल स्किनसाठी  ग्रीन टी फेसपॅक 

दोन चमचे हळद, एक चमचा ग्रीन टी आणि एक चमचा बेसन एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून त्यावर तयार पेस्ट अप्लाय करा. जवळपास 20 मिनिटांनी कॉटन बॉलवर गुलाब पाणी घ्या आणि सुकलेला फेसपॅक या कॉटन बॉलच्या मदतीने पुन्हा ओला करा. आता दोन्ही हातांनी स्क्रब करत चेहऱ्यावरील फेसपॅक काढूव टाका आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळण्यासोबतच पिंपल्सची समस्या दूर करण्यास मदत होते. 

कॉम्बिनेशन स्किनसाठी ग्रीन टी फेसपॅक 

ताही महिलांचा चेहऱ्याचा टी शेप ऑइली असतो. म्हणजेच, फॉरहेड, नाक आणि हनुवटी ऑयली आणि बाकीची स्किन ड्राय असते. अशा स्किनसाठी तुम्हाला ऑरेंज पील आणि ग्रीन टी फेसपॅक वापरणं फायदेशीर ठरतं. फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा चमचा मध, एक चमचा ग्रीन टी आणि एक चमचा संत्र्याच्या सालींची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यामध्य गुलाब पाणी वापरू शकता. 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करत काढून टाका. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. 

ड्राय स्किनसाठी ग्रीन टी पॅक 

जर तुमची स्किन ड्राय असेल, तर दोन चमचे मधामध्ये एक चमचा ग्रीन टी एकत्र करून पेस्ट तयार करा. आता चेहरा स्वच्छ करून कोरडा करा आणि त्यावर तयार केलेला फेसपॅक अप्लाय करा. 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोन वेळापेक्षा जास्त या फेसपॅखचा वापर करू नका. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Green tea face pack for all type skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.