उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सने हैराण आहात?; 'हा' फेसपॅक ट्राय करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 01:52 PM2019-04-13T13:52:34+5:302019-04-13T14:11:55+5:30

उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुमची स्किन ऑयली असेल तर स्किनची काळजी घेणं आणखी अवघड होतं.

english title - If you have trouble with acne in summer then try this face pack | उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सने हैराण आहात?; 'हा' फेसपॅक ट्राय करा 

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सने हैराण आहात?; 'हा' फेसपॅक ट्राय करा 

उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुमची स्किन ऑयली असेल तर स्किनची काळजी घेणं आणखी अवघड होतं. तसेच उन्हाळ्यामध्ये ऑयली स्किनवर पिंपल्सही जास्त पहायला मिळतात. जर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या त्वचेच्या समस्यांनी हैराण असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या त्वचेच्या समस्या दूर करू शकता. 

मध आणि लिंबाचा फेसपॅक 

चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सच्या समस्येने हैराण असाल तर लिंबू आणि मधाचा फेसफॅक आणि इतर काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम एक बाउल घ्या आणि त्यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. त्यानतर यामध्ये अर्धा चमचा मध एकत्र करा. दोन्ह पदार्थ एकत्र करा. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही यामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करू शकता. तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. जवळपास 15 मिनिटांसाठी हे तसचं ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 

असा होतो फायदा

मध आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असण्यासोबतच व्हिटॅमिन-सी देखील असतं. ज्यामुळे हे पिंपल्सची समस्या दूर करण्यासोबतच त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करतात. लिंबू आणि मधाचं हे मिश्रण त्वचा मॉयश्चराइज करतं. हा पॅख त्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो ज्यांची त्वचा ड्राय असते. खरं तर लिंबू त्वाच स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तसेच त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसेच मधामधील अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल तत्व ऑयली स्किनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

त्वचेसाठी फायदेशीर घरगुती उपचार :

- मधामध्ये अनेक अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात. ज्यामध्ये फ्लेवोनोइड तसेच फेनोलिक कंपाउंड यांसारख्या तत्वांचा समावेश असतो. 

- काही संशोधनांमधून असं समजलं आहे की, मध डायबिटीज असणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतं. 

- मध शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. हे गुड कोलेस्ट्रॉल वाढवून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. 

- मधामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरतात. ज्यामध्ये शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासही मदत होते. 

- मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी मदत करतात. 

लिंबूदेखील फायदेशीर 

- लिंबासारख्या आंबट फळामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतं. हे एक अॅन्टीऑक्सिडंट आहे जे वातावरणातील प्रदूषणापासून बचाव करण्याचं काम करतो. 

- लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड किडनी स्टोन रोखण्यासाठी मदत करतं. 

- अनेक लोकांना बद्धकोष्टाच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठल्यावर लिंबू पिणं फायदेशीर ठरतं. 

- लिंबामध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन-सी त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत करतं. तसेच वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही मदत करतं. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: english title - If you have trouble with acne in summer then try this face pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.