आउटिंगच्या वेळी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वापरा 'या' टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:53 PM2018-10-09T12:53:54+5:302018-10-09T12:56:02+5:30

बदलती जीवनशैली आणि वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये तुम्ही पिकनिकचा प्लॅन करत असाल आणि कॅज्युअल लूक करण्याच्या विचारात असाल.

easy steps to get natural glow | आउटिंगच्या वेळी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वापरा 'या' टिप्स!

आउटिंगच्या वेळी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वापरा 'या' टिप्स!

Next

बदलती जीवनशैली आणि वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये तुम्ही पिकनिकचा प्लॅन करत असाल आणि कॅज्युअल लूक करण्याच्या विचारात असाल. तसेच काही आउटडोर लूक्स करण्याचाही प्लॅन असेल तर यामध्ये हेवी मेकअप सूट करणार नाही. पण अशातच सर्वात सुंदर दिसायचं असेल तर गोंधळून जाऊ नका. तुम्हाला आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही नॅचरल ग्लो मिळवू शकता. 

1. फ्रेश व्हा 

चांगल्या मेकअपची सुरुवात फ्रेश स्किनने होते. पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटेल की, तुमच्या चेहऱ्याची चमक 100 टक्के नॅचरल आहे. त्यासाठी चेहरा चांगल्या फेसवॉशने धुवून घ्या. त्यानंतर मुलायम कापडाने किंवा टॉवेलने सुकवून घ्या. त्यानंतर स्किन टोनर लावून त्यावर मायश्चरायझर लावा. स्किनला नैसर्गिक पद्धतीने चांगलं ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या, आहारामध्ये ज्युसचा समावेश करा. स्किन सेल्स हे पाण्यापासून तयार झालेले असतात. जर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी असेल तर तुमची स्किन निस्तेज दिसू लागेल. त्यामुळे दर अर्ध्या तासाने पाणी पिणं गरजेचं आहे. 

2. फाउंडेशनचा वापर टाळा. 

फाउंडेशन क्रिम लावणं टाळा. मॉयश्चरायझर किंवा बीबी क्रिमनंतर थोडंसं ब्लशर आणि आयशॅडो लावू शकता. तुम्ही कोणताही मेकअप करणार असल्यास, ब्रशने करण्याऐवजी हाताच्या बोटांचा वापर करा किंवा मेकअप स्पॉजने मेकअप चेहऱ्यावर अप्लाय करा. मेकअप करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या. क्रिम लावल्यानंतर थोडीशी फेस पावडर लावा. चेहऱ्याचे डार्क आणि रेड एरिया म्हणजेच नाकाच्या आसपास, डोळ्यांच्या खाली लाइट रिफ्लेक्टिंग कंन्सिलर लावा. 

3. डोळ्यांची काळजी घ्या.

जर चांगलं दिसण्याची इच्छा असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्या. डोळे थकलेले दिसत असतील तर मस्करा नक्की लावा. पहिल्यांदा एक कोट पापण्यांच्या वरून खालपर्यंत लावा. थोडा वेळ सुकू द्या, त्यानंतर पुन्हा एक कोट पापण्यांच्या खालून वरच्या बाजूला लावा. त्यामुळे तुमच्या पापण्या दाट आणि कर्ली दिसण्यास मदत होईल. 

4. लिप ग्लॉस वापरा

तुमच्या मेकअपच्या लूकमध्ये जीव आणण्यासाठी नॅचरल कलर असलेला लिप ग्लॉस वापरा. हा आपल्या नॅचरल शेडपेक्षा ब्राइट कलरचा असणं गरजेचं आहे. 

5. वॉटर स्प्रे

जर फार मोठा आणि थकवा आणणारा प्रवास किंवा आउटिंग असेल तर वॉटर स्प्रे तुमची मदत करू शकेल. जेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा डल झाल्यासारखा वाटेल त्यावेळी रूमालाचा वापर न करता, चेहऱ्यावर वॉटर स्प्रेने स्प्रे करा. त्यासाठी तुम्ही रोज वॉटरचाही वापर करू शकता. 

Web Title: easy steps to get natural glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.