पुरूषांसाठीचे 'हे' 4 फेसमास्क; त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:33 PM2019-07-24T12:33:56+5:302019-07-24T16:22:24+5:30

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही, महिलांप्रमाणेच पुरूषही आपलं सौंदर्य जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.

Best homemade face packs for mans | पुरूषांसाठीचे 'हे' 4 फेसमास्क; त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी करतील मदत

पुरूषांसाठीचे 'हे' 4 फेसमास्क; त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी करतील मदत

googlenewsNext

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही, महिलांप्रमाणेच पुरूषही आपलं सौंदर्य जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अनेकदा ते बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांसोबतच सलॉनमधील महागड्या ट्रिटमेंट्सही फॉलो करत असतात. अशातच अनेक पुरूषांना कामानिमित्त सतत बाहेर रहावं लागतं. धूळ आणि ऊन्हामुळे त्यांची त्वचा डॅमेज होते. अशातच डॅमेज झालेल्या त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी तुम्ही घरीच काही फेसपॅक तयार करू शकता. हे फेसपॅक्स चेहऱ्यावर ग्लो आणण्यासोबतच ऊन आणि प्रदूषणामुळे होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यासाठी मदत करतात. 

(Image Credit : rutupic.pw)

दूधाचा फेस पॅक 

दूधाचा फेस पॅक नैसर्गिक असतो, जो त्वचेमध्ये आतपर्यंत जाऊन डेड स्कि रिकव्हर करण्यासाठी मदत करतो. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. याव्यतिरिक्त बंद पोर्स ओपन करण्यासाठी दूधातील पोषक घटक मदत करतात. 

असा तयार करा मिल्क फेस पॅक 

मिल्क फेस पॅक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये दूध घ्या आणि कापूस किंवा रेशमी कपड्याच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. साधारणतः 15 ते 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही दिवसांपर्यंत असं केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. तसेच त्वचा उजळण्यासही मदतत होईल. 

बनाना फेस पॅक 

केळी वापरून तयार केलेला फेसपॅख पुरूषांच्या निस्तेज त्वचेवर ग्लो आणण्यासाठी मदत करतो. केळ्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये खोलवर जाऊन त्वचेचं आरोग्य राखण्याचं काम करतात. 

असा तयार करा बनाना फेस पॅक 

गुलाब पाण्यामध्ये केळ्याची पेस्ट एकत्र करून चेहऱ्यावर लावून थोडा वेळासाठी तसचं ठेवा. त्यानंर पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. अशाप्रकारे केळीपासून तयार केलेला फेस फॅक वापरल्याने डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होते. 

मुलतानी माती 

मुलतानी माती वापरून तयार करण्यात आलेला फेसपॅक पुरूषांच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मुलतानी मातीतील गुणधर्म त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतात. 

असा तयार करा मुलतानी मातीचा फेसपॅक 

गुलाब पाणी आणि मुलतानी माती एकत्र करून एक पेस्ट तयार करून घ्या. काही वेळानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जर नियमितपणे हा उपाय फॉलो केला तर तुम्हाला त्वचेवर फरक जाणवेल. मुलतानी माती त्वचा मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. 

पपईचा फेसपॅक 

पुरूषांच्या त्वचेसाठी पपईचा फेसफॅक फायदेशीर ठरतो. त्यासाठी पपईची पेस्ट तयार करून घ्या. यामुळे त्वचेचा उजाळा वाढवण्यासाठी मदत होते. 

असा तयार करा पपई फेसपॅक 

पपई कापून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दूध व्यवस्थित एकत्र करा. तयार फेसपॅक दोन्ही हातांनी आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दहा मिनिटांसाठी तसचं ठेवून पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या फेसपॅकमुळे चेहरा स्वच्छ होण्यासोबतच त्वचा उजळवण्यासाठीही मदत होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Best homemade face packs for mans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.