​Beauty : चमकदार दाढीसाठी आवळ्याचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2017 09:08 AM2017-07-11T09:08:23+5:302018-06-23T12:04:27+5:30

दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

Beauty: Use it to shine for a shiny beard! | ​Beauty : चमकदार दाढीसाठी आवळ्याचा असा करा वापर !

​Beauty : चमकदार दाढीसाठी आवळ्याचा असा करा वापर !

Next
ला लूक परफेक्ट दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार डोक्याच्या तसेच दाढी आणि मिशीच्या केसांची ठेवण अतिशय महत्त्वाची असते. बॉलिवूडचे बरेच सेलेब्स आपल्या लूकची विशेष काळजी घेतात, त्यातच दाढी कशी रुबाबदार दिसेल यासाठी ते खास प्रयत्नही करतात. 
आवळ्याचे आयुर्वेदिक फायदे आपणास माहित आहेतच. विशेष म्हणजे शारीरिक फायद्यांप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही आवळ्याचा विशेष फायदा होत असतो. दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या. 

* आवळ्याचा एक तुकडा व खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलात आवळ्याचा तुकडा त्याचा रंग बदलेपर्यंत गरम करा. त्यानंतर हे तेल गार झाल्यानंतर दाढीच्या केसांना लावल्यास केसांची शायनिंग वाढण्यास मदत होते. 

* या व्यतिरिक्त हे तेल लावल्यास दाढीचे केस दाट होतील शिवाय दाढी-मिशीचे पांढरे केस दूर होण्यासही मदत होईल. 

* आवळ्यामधील व्हिटॅमिन ‘सी’ आणि फॅटी अ‍ॅसिड्समुळे दाढी-मिश्यांच्या केसांना नरिशमेंट मिळत असल्याने दाढीच्या केसांची शायनिंग वाढण्यास मदत होते.  

* खोबरेल तेलात मिसळण्यासाठी आवळा नसेल तर आवळ्याचे पावडरही वापरु शकता. 

* आवळ्याचा वापर केल्यास केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते आणि केस गळतीही थांबते.

* आवळा बारीक करुन केसांच्या मुळांवर लावल्यास दोनतोंडी केसांची समस्या दूर होते. 
 
* केसांचा कोरडेपणादेखील आवळ्यामुळे दूर होतो.  

Web Title: Beauty: Use it to shine for a shiny beard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.