Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2017 07:34 AM2017-07-07T07:34:50+5:302017-07-07T13:04:50+5:30

आपल्या त्वचेवर पिंपल्स आहेत, त्वचा तेलकट आहे, चेहऱ्यावर डाग आहेत..आदी समस्यांसाठी हे आहेत परफेक्ट उपाय !

Beauty Tips: 'These' are the perfect home remedy for every skin problem! | Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !

Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !

Next
ong>-रवींद्र मोरे 
घरगुती उपाय खूपच प्रभावी आणि सुरक्षित असतात, यात तिळमात्र शंका नाही. या उपायांचा परिणाम निश्चितच उशिराने लागतो, मात्र यामुळे निराशा कधीही पदरी पडत नाही. जर या घरगुती उपायांचा वापर योग्य प्रकारे आणि नियमित केल्यास कोणत्याही ब्यूटी प्रोडक्ट किंवा ट्रीटमेंटची गरज भासणार नाही. चला जाणून घेऊया, त्या घरगुती उपायांच्या बाबतीत ज्याद्वारे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतील आणि आपल्याला मिळेल सुंदर त्वचा.  

* चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. त्यातील एक प्रभावी उपाय म्हणजे टोमॅटो आणि गुलाबपाण्याची पेस्ट. यासाठी अर्ध्या टोमॅटोला ठेचून त्यात गुलाबपाणी मिक्स करा. ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. १० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवस हा प्रयोग करावा. आपण टोमॅटो ऐवजी काकडीचाही वापर करु शकता. ज्यांची सेंसिटिव्ह स्किन आहे त्यांनी मात्र एकदा ही पेस्ट वापरण्या अगोदर एक पॅच लावून टेस्ट करावी.  

* ग्लोविंग स्किनसाठी आपण दोन सोप्या फेस पॅकचा वापर करु शकता. पहिला म्हणजे दररोज दोन चमच दही मध्ये एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. दुसरा म्हणजे संत्रीच्या टरफल्यांना कोरडे करून त्याचे पावडर तयार करावे. एक चमच पावडरमध्ये एक चमच मध, चिमूटभर हळद पावडर, दोन-तीन लिंबूच्या रसाचे थेंब आणि पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. कोरडी झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.  

* आपण तेलकट त्वचेने त्रस्त असाल तर एक चमच मुलतानी माती, एक चमच गुलाबपाणी आणि अर्धा चमच केसर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल शिवाय त्वचेचा ग्लोदेखील वाढले.

* आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर अगोदर काही निंबाच्या पानांचा चांगले स्वच्छ धुवा. त्यानंतर अर्धी काकडी घेऊन दोन्हीही एकजीव करा आणि ही पेस्ट पिंपल्सवर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवसांसाठी हा उपाय दररोज केल्यास पिंपल्स दूर तर होतील शिवाय आपली स्किन मॉइश्चराइज्डदेखील होईल.  

* आपली स्किन सॉफ्ट असावी, असे कोणाला वाटणार नाही. यासाठी आपणास जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी एक चमच अ‍ॅलोवेरा जेल, एक चमच मध आणि लिंबूच्या रसाचे काही थेंब एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटानंतर स्वच्छ धुवा. आठवड्यातून दर दोन दिवसांनी असे करा. शिवाय हळद, चंदन पावडर आणि गुलाबपाणीने बनलेल्या पॅकचाही आपण सॉफ्ट स्किनसाठी वापर करु शकता.  

* ग्लोविंग त्वचेसाठी एक सोपा पॅक आपण वापरू शकता. यासाठी दोन चमच बेसन, अर्धा चमच हळद पावडर आणि तीन चमच दूध किंवा गुलाबपाणी एकत्र करुन चेहरा आणि मानेवर लावावे. आठवड्यातून दोनदा या पेस्टचा वापर करावा. यामुळे त्वचा ग्लो होण्यास मदत होते.   

Also Read : ​Beauty Tips : ​पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर !
                   : ​Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !

Web Title: Beauty Tips: 'These' are the perfect home remedy for every skin problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.