चामखीळ दूर करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:22 PM2018-07-19T12:22:45+5:302018-07-19T12:26:38+5:30

अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे चामखीळ दूर केली जाऊ शकते. 

Beauty Tips : 6 ways to get rid of warts naturally | चामखीळ दूर करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

चामखीळ दूर करण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

googlenewsNext

अनेकांच्या चेहऱ्यावर मोस किंवा चामखीळ तुम्ही पाहिली असेल. काहींच्या अंगावर तर इतके चामखिळ असतात की, ते त्यामुळे वैतागलेले असतात. कारण त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होत असतो. अशात अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे चामखीळ दूर केली जाऊ शकते. 

1) बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने मोस हळूहळू कमी होण्यास मदत होते.

2) लिंबाचा रस : लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस काही वेळांसाठी तसाच ठेवा.

3) सफरचंदाचं व्हिनेगर : मोसची म्हणजेच चामखीळची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल. 

4) अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोस दूर करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.

5) बेकिंग सोडा : बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

6) लसून : लसनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

टिप - चामखीळ हटवण्यासाठी देण्यात आलेले उपाय करण्याआधी स्कीनवर एक पॅच टेस्ट करून बघा. असे यासाठी कारण काहींना वरील काही गोष्टींची अॅलर्जीही असू शकते. 

Web Title: Beauty Tips : 6 ways to get rid of warts naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.