महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:16 PM2018-10-24T13:16:11+5:302018-10-24T13:17:34+5:30

दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं.

5 items every working women should have in her bag | महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

महिलांनी आपल्या पर्समध्ये 'या' गोष्टी अवश्य ठेवाव्यात!

Next

दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. सकाळच्या धावपळीतून, गर्दी आणि उन्हाचा त्रास सहन करत ऑफिसमध्ये पोहोचणं बऱ्याचदा त्वचेच्या समस्यांचं कारण होतं. दररोज पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं. अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना कधीही करावा लागू शकतो. या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आधीच काळजी घेणं गरजेचं असतं. तुमच्या पर्संमध्ये अशी जागा ठेवा की ज्यामध्ये तुम्ही अशा वस्तू ठेवू शकाल ज्या तुमचा कॉन्फिडन्स आणि स्मार्टनेस वाढविण्यासाठी मदत करतील. त्याचप्रमाणे अचानक आलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठीही फायदेशीर ठरतील. जाणून घेऊया अशा गोष्टींबाबत ज्या महिलांनी त्यांच्या पर्समध्ये बाळगणं गरजेचं आहे...

सॅनिटरी पॅड्स :

महिलांना दरमहिन्याला येणारी मासिक पाळी ही त्यांच्या नॉर्मल लाइफचाच एक भाग आहे. त्यामुळे तुमच्या पर्समध्ये नेहमी सॅनिटरी पॅड्सचं एक पॅकेट ठेवणं गरजेचं असतं. हल्ली अनेक ऑफिसमध्ये याची सुविधा देण्यात येते पण तरीसुद्धा तुमच्या पर्समध्ये हे असणं कधीही उपयोगी पडेल. 

सॅनिटायझर :

आपण दिवसभर बाहेर असताना नेहमी पाणी किंवा हॅन्डवॉशचा वापर करू शकत नाही. अॅन्टीसेफ्टिक गोष्टींमध्ये आतापर्यंतची सर्वात उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे सॅनिटायझर. याचे फक्त दोन थेंब हातांवरची धूळ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे बाहेर फिरताना तुमच्या पर्समध्ये सॅनिटायढर असेल तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
 
वेट टिश्यू :

चेहऱ्यावरील मेकअप खराब झाला असल्यास अनेकदा वेट टिशूचा वापर केल जातो. प्रत्येकवेळी पाण्याने चेहरा स्वच्छ करणं शक्य होत नाही अशा वेळी वेट टिश्यूच्या मदतीने चेहरा स्वच्छ करणं सहज शक्य होतं. 

स्मॉल मेकअप किट :

वेगाने बदलत असणाऱ्या ऑफिस एटीकेट्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पर्सनॅलिटी. त्यामुळे नेहमी प्रेझेंटेबल राहण्यासाठी एक स्मॉल मेकअप किट तुमच्या पर्समध्ये राहणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या बॅगमध्ये सेप्टी पिन, काजळ, लिपस्टिक, सनस्क्रिन यांसारख्या गोष्टी असणं फायदेशीर ठरतं. 

मेडिकल किट :

बदलत्या वातावरणामुळे कधी आणि कसं आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे काही साधारण आणि कॉमन औषधांचा एक किट तयार करा. ज्यामध्ये पेन किलर, ग्लूकोज, बँडेड आणि अॅन्टी-एलर्जिक औषधांचा समावेश असेल. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त तुमच्या बॅगमध्ये नेहमी एक पाण्याची बाटली ठेवा.

Web Title: 5 items every working women should have in her bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.