चुरशीच्या लढतीत सिंधूचा पराभव, जपानच्या यामागुचीनं कोरलं दुबई ओपन बॅडमिंटन चषकावर नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 05:16 PM2017-12-17T17:16:56+5:302017-12-17T17:27:31+5:30

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.

Sindhu defeats Japan's Yumaguchin to win Dubai Open badminton title | चुरशीच्या लढतीत सिंधूचा पराभव, जपानच्या यामागुचीनं कोरलं दुबई ओपन बॅडमिंटन चषकावर नाव

चुरशीच्या लढतीत सिंधूचा पराभव, जपानच्या यामागुचीनं कोरलं दुबई ओपन बॅडमिंटन चषकावर नाव

Next

दुबई - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतच्या आंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही सिंधूला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा सरळ तीन सेटमध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  पहिला सेट जिंकल्यानंतर  दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. पहिल्याच गेममध्ये 5-9 अशी पिछाडीवर असलेल्या सिंधूने सामन्यात पुनरागमन करत अकाने यामागुचीवर 21-15, 21-21 असा दणदणीत विजय मिळवला. दुबईच्या शेख हमदान इंडोर स्टेडियममध्ये जवळपास दीड तास हा सामना रंगला.  
पहिला गेम सहजपणे बाजी मारलेल्या सिंधूला दुस-या गेममध्ये यामागुचीकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी यामागुचीनं जोरदार पुनरागमन करत सिंधूला चांगलच झुंजवलं. दुसऱ्या सेटमध्ये सिंधू 16-11 अशी पिछाडीवर पडली. दुसऱ्या सेटमधील यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूनं हा सेट 21-12 अशा फरकानं गमावला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूनं काही चुका केल्या. यामागुचीच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे सिंधूने नियंत्रण गमावले. एकवेळ सिंधूने 7-7अशी बरोबरी साधत सामन्यात रंग भरले खरे, परंतु यानंतर यामागुचीने 10-13 अशी आघाडी घेत अखेरपर्यंत आपले वर्चस्व राखले. 
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधूने आक्रमक सुरुवात करत केली. एकवेळ सिंधू 4-0 अशी आघाडी घेतली होती. पण निर्णायक क्षणी यामागुचीनं निर्णायक आणि आक्रमक फटकेबजी करत सिंधूचा पराभव केला.  यामागुचीच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे सिंधूने नियंत्रण गमावले. तिसरा सेट आतिशय रोमांचक पद्धतीनं झाला. 4-0, 5-5, 10-8, 13-12, 16-17, 17-17, 19-19 अशा रोमांचक पद्धतीत तिसरा सेट झाला. यामागुची आणि सिंधूनं प्रेक्षकांची मने जिंकली. 

Web Title: Sindhu defeats Japan's Yumaguchin to win Dubai Open badminton title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton