टाटा मोटर्सची नवीन Mini SUV येणार; निस्सान मॅग्नाईट, रेनो काइगरला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:24 PM2021-08-16T18:24:19+5:302021-08-16T18:25:01+5:30

Tata Motors Mini SUV Tata Hornbill Launch Features: टाटा आता मजबूत कारसाठी ओळखली जाऊ लागली आहे. टाटाने फक्त मालवाहकच बनवावेत असे म्हणणारे देखील आता टाटाच्या कार घेऊ लागले आहेत.

Tata Motors to launch new Mini SUV Hornbill; will hit Nissan Magnet, Renault Kieger | टाटा मोटर्सची नवीन Mini SUV येणार; निस्सान मॅग्नाईट, रेनो काइगरला टक्कर देणार

टाटा मोटर्सची नवीन Mini SUV येणार; निस्सान मॅग्नाईट, रेनो काइगरला टक्कर देणार

googlenewsNext

भारतीय बाजारात हॅचबॅकचा जमाना गेला, छोट्या एसयुव्हींचा जमाना आला अशी स्थिती आहे. मिड साईज एसयुव्हींना मोठी मागणी आहे. याचसोबर मायक्रो आणि मिनी एसयुव्हींची देखील डिमांड वाढली आहे. यामुळे टाटा मोटर्स, मारुती, ह्युंदाई सारख्या कंपन्या येत्या काळात Mini SUV लाँच करणार आहेत. टाटा मोटर्सची Tata Hornbill देखील लवकरच लाँच केली जाणार आहे. (Tata Motors Mini SUV Tata Hornbill Launch soon)

Tata Motors: टाटा मोटर्सची जबरदस्त स्कीम! शेतकरी, पेन्शन धारकांना कमी व्याजदराने कार देणार 

टाटा आता मजबूत कारसाठी ओळखली जाऊ लागली आहे. टाटाने फक्त मालवाहकच बनवावेत असे म्हणणारे देखील आता टाटाच्या कार घेऊ लागले आहेत. यामुळे टाटा हॉर्नबिल ही कार देखील सुरक्षितच असणार आहे. निसान मॅग्नाईट, रेनो ट्रायबर, काईगर सारख्या कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी टक्कर देण्यासाठी हॉर्नबिल कार लाँच होणार आहे. सध्या भारतीय बाजारात टाटा नेक्सॉनचा जलवा आहे. 

XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार; स्कॉर्पिओ सोबतही असेच घडलेले

सध्या टाटाचे 950 आऊटलेट आहेत. येत्या सहा महिन्यांत टाटा आणखी 250 आऊटलेट उघडणार आहे. Tata Hornbill Mini SUV मध्ये 1.2 लीटरचे तीन सिंलिंडर इंजिन देण्यात येऊ शकते. 86bhp ताकद देईल. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 110bhp ताकद प्रदान करेल. मिनी एसयूवी 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गियरबॉक्स देण्यात येईल. टाटा हॉर्नबिलचे एक्स्टिरिअर आणि इंटिरिअर फिचर्स खास असतील. गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये ही मिनी एसयुव्ही दाखविण्यात आली होती. 

Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...

टाटा मोटर्सने (Tata Motors) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी व्याजदराची आणि कमी डाऊनपेमेंटची ऑफर आणली आहे. यासाठी टाटा मोटर्सने बँक ऑफ महाराष्ट्रसोबत (Bank of Maharashtra) हातमिळवणी केली आहे. टाटा मोटर्स काही अटींवर ग्राहकांना 7.15% व्याजापासून कर्ज देणार आहे. हे व्याज रेपो रेटनुसार असणार आहे. टाटा मोटर्सची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Ola vs Simple One: सिंपल वनने ओला इलेक्ट्रीक स्कूटरला किंमत, रेंजमध्ये पछाडले; जाणून घ्या दोन्हींतील फरक...

मान्सून धमाका ऑफरद्वारे ही कर्ज प्रक्रिया केली जाणार आहे. नव्या ग्राहकांना 7 वर्षांसाठी प्रति लाख 1517 रुपये सुरुवात विशेष EMI चा पर्याय देण्यात येणार आहे. कार्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना आणि कार्पोरेट सॅलरी अकाऊंटवाल्यांना रिटर्नमेंट ऑफ इंटरेस्ट (ROI) मध्ये 0.25 टक्के सूट दिली जाणार आहे. 

Web Title: Tata Motors to launch new Mini SUV Hornbill; will hit Nissan Magnet, Renault Kieger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा