many new vehicles launched with start of autoexpo 2018 | भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018
भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018

नवी दिल्ली- वाहन उद्योगांच्यादृष्टीनेच नव्हे तर वाहनाच्या ग्राहकांच्या व सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारा ऑटो एक्स्पो अर्थात वाहनांचे प्रदर्शन हा भारतामधील एक वाहनउद्योगाचा जणू महाकुंभमेळाच असतो. १९८६ पासून दर दोन वर्षांनी भरवला जाणारा हा मेळा आहे. देशातील व जगभरातील विविध वाहन कंपन्या, वाहनउद्योगाशी संलग्न साधनसामग्री, सुटे भाग, तंत्रज्ञान यांचे समग्र दर्शन घडवणारा हा मेळा म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत एक पर्वणीच म्हणावी लागते. या मेळ्याचे आयोजन हे ऑटोमोटिव कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एक्मा), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चर्र्स (सिआम) और कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआईआई) यांच्याकडून प्रामुख्याने केले जाते. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी या ऑटो एक्स्पोला प्रारंभ झाला असून त्यामध्ये विविध कंपन्यांच्या उत्पादनांचे खास सादरीकरणही झाले आहे.

यावेळी २०१८ मधील ऑटो एक्स्पो सध्याच्या भारतीय व जागतिक स्थितीमध्ये होणारा महत्त्वाचा असा सोहळा म्हणायला हवा. या एक्स्पोला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स (ओआयसीए) यांची मान्यता आहे. किंबहुना त्यादृष्टीने हा ऑटो एक्स्पो लोकांच्या, उत्पादकांच्या आिण सरकारच्याहीदृष्टीने एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. वातावरणाचा परिणाम, प्रदूषण, पेट्रोल, डिझेल आदींच्या वाढत्या किंमती या दृष्टीने वाहन उद्योगाला व विशेष करून वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या भविष्याच्यादृष्टीने एक दिशादर्शक ठरणार आहे. यामुळेच भारत सरकारने विद्युत ऊर्जा, पर्यायी ऊर्जा, बायोडिझेल, आदी प्रकारच्या इंधन वापराच्यादृष्टीने मांडलेल्या संकल्पनेला या एक्स्पोमध्ये विविध कंपन्याही आपल्या आगळ्या उत्पादनांच्या प्रदर्शनातून साकारीत आहेत. किंबहुना या एक्स्पोचे हे एक मोठे आगळेपण आहे असे म्हणावे लागले. इलेक्ट्रिक वाहनांच्या खास विभागाला विविध कंपन्यांनी यावेळी साकारले आहे.

दि. ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान सर्वांसाठी खुल्या असलेल्या या एक्स्पोला ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली आहे. त्यात विविध कंपन्यांनी आपल्या विभागाचे, आपल्या नव्या संकल्प वाहनांचे प्रदर्शन मांडले आहे. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्ट येथे आयोजित केलेल्या या एक्स्पोमध्ये यावेळी २४ नव्या वाहनांचे सादरीकरण होणार असून १०० वाहनांटे या वर्षासाठी सादरीकरण वा उद्घाटन होणर आहे. १०० प्रदर्शक यामध्ये सहभागी आहेत तर या आधी ८८ प्रदर्शक होते. मात्र यावेळी संख्या चांगलीच वाढली आहे.

या प्रदर्शनीमध्ये फॉक्सवॅगन, ट्रम्फ मोटरसायकल्स, बजाज ऑटो, फिएट क्रिस्लर, फोर्ड, व्हॉल्वो, हार्ले डेव्हिडसन, रॉयल एनफिल्ड, निस्सान या कंपन्यांनी सहभाग घेतलेला नाही. या कंपन्यांचा सहभाग का नाही, हे देखील चर्चेचे विषय ठरले आहेत. एक म्हणजे काहींच्या मते यांच्याकडे नवे काही शोकेसमध्ये आणण्यासारखे काही नाही किंवा जीएसटीमुळे येऊ घातलेल्या उत्पादनांबाबत विचार करीत आहेत तसेत बीएस४, बीएस ६ या पर्यावरणीय मानांकनासंबंधात व विद्युत वाहनांसंबंधात त्यांचा विचार चालू आहे. सरकारकडून विद्युत वाहनांच्या संबंधात स्पष्ट धोरण सादर व्हावे अशीही काही उत्पादकांची मागणी आहे. अशा विविध कारणांमुळे प्रदर्शनामध्ये असणारी त्यांची अनुपस्थिती जाणवणार आहेच.

ठळक वैशिष्ट्ये

गेल्या ऑटो शोमध्ये ११ स्टार्टअप कंपन्यांनी भाग घेतला मात्र यावेळी ही संख्या फक्त दोन इतकीच आहे.

६० हजार चौरसमीटर जागेत हे प्रदर्शन भरले असून २० पेक्षा जास्त देशांमधील उत्पादक यात सहभागी आहेत. एकंगर १२००पेक्षा जास्त प्रदर्शनकांचा यात सहभाग आहे.यामध्ये आंतरराष्ट्रीय अशी ७ दालने अाहेत.

यामध्ये ८ लाख लोकांचा सहभाग असेल.

३६ पेक्षा जास्त वाहन उत्पादक आपल्या वाहनांना सादर करणार आहेत.

इलेिक्ट्रक अर्थात विद्युत वाहनाचे प्रदर्शन हे यावेळचे विशेष आकर्षण आहे.

प्रदर्शनासाठी नेहमीच्या दिवशी व्यावसायिक वेळेमध्ये तिकीट ७५० रुपये असून सार्वजनिक वेळेत ३५० रुपये आहे.

व्यावसायिक वेळ सकाळी १० ते दुपारी १ अशी असून दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक्स्पोसाठी सार्वजनिक वेळ आहे.

सप्तांहात दिवशी तिकीटाची किंत ४७५ रुपये आहे.

वाहन प्रदर्शन व साधनसामग्री प्रदर्शन असे दोन भाग या ऑटो एक्स्पोचे आहेत.


Web Title: many new vehicles launched with start of autoexpo 2018
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.