XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार; स्कॉर्पिओ सोबतही असेच घडलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:30 PM2021-08-16T16:30:51+5:302021-08-16T16:31:17+5:30

Mahindra XUV 700 news: महिंद्राने एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV 700) जगभरातील बाजारासाठी लाँच केली आहे. सुरुवातीला काही व्हेरिअंट लाँच केले असून अन्य व्हेरिअंट काही महिन्यांत लाँच केले जाणार आहेत. महिंद्राची ही खेळी एन्ट्री लेव्हल म्हणून पाहिली जात आहे. यामुळे महिंद्राने कृपया, या लाँचिंगला एन्ट्री लेव्हल म्हणू नका, असे आवाहन केले आहे.

Mahindra XUV 700 can drop  XUV500 sales; mahindra scorpio close victim 2 years back | XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार; स्कॉर्पिओ सोबतही असेच घडलेले

XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार; स्कॉर्पिओ सोबतही असेच घडलेले

googlenewsNext

महिंद्राने एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV 700) जगभरातील बाजारासाठी लाँच केली आहे. सुरुवातीला काही व्हेरिअंट लाँच केले असून अन्य व्हेरिअंट काही महिन्यांत लाँच केले जाणार आहेत. महिंद्राची ही खेळी एन्ट्री लेव्हल म्हणून पाहिली जात आहे. यामुळे महिंद्राने कृपया, या लाँचिंगला एन्ट्री लेव्हल म्हणू नका, असे आवाहन केले आहे. हे कमी नाही, तोवर XUV 700 कमी किंमतीत महिंद्राने कशासाठी, कोणाला टक्कर देण्यासाठी उतरविली हेच समजेनासे झाले आहे. अनेकांनी XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. (Mahindra XUV 700 will Harm XUV500 sales, same thing happened with mahindra scorpio.)

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झालेली ट्रोल, लोकांना नापसंद

महिंद्राने नव्या लोगोसह ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. भारतीय बाजारात महागड्या एसयुव्ही आहेत. यामध्ये टाटा हॅरिअर, टाट सफारी, टोयोटा फॉर्च्युनर, एमजी हेक्टर, ह्युंदाई अल्काझारला ही एसयुव्ही 700 टक्कर देईल असे म्हटले जात आहे. परंतू दुसऱ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या नादात महिंद्रा आपल्याच दोन एसयुव्हींना नुकसान पोहोचविणार आहे. 

महिंद्राचा एक वेगळा असा ग्राहक आहे. स्कॉर्पिओची अपग्रेड म्हणजे एक्सयुव्ही 500, एक्सयुव्ही 500 ची अपग्रेड म्हणजे महिंद्रा अल्टुरस आहे. स्कॉर्पिओनंतर हा ग्राहक एक्सयुव्ही 500 कडे वळतो. परंतू आणखी लाखभर रुपये मोजले तर महिंद्रानेच XUV700 त्यांच्यासमोर ठेवली आहे. यामुळे हा ग्राहक 500 सोडून 700 वर जाण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका एक्सयुव्ही 500 ला बसणार आहे. कारण ग्राहकाला वाहन बाजारात काहीतरी नवे हवे असते. 

'अशी' दिसते Mahindra XUV 700; 5 सेकंदात 60kms चा स्पीड, पाहा किंमत आणि फीचर्स

XUV500 ठरली स्कॉर्पिओ किलर...
2020 मध्ये 31,240 स्कॉर्पियो विकल्या गेल्या होत्या. कोरोनाचा परिणाम असेलही, परंतू स्कॉर्पिओ ही बोलेरोनंतर दुसऱ्या पसंतीची एसयुव्ही होती. 2019 मध्ये 46,699 स्कॉर्पिओ विकल्या गेल्या होत्या. गेल्या वर्षी 15459 युनिट कमी विकल्या गेल्या. याचे एक कारण XUV500 ची मागणी वाढल्याचेही आहे. XUV500 मुळे बोलेरो आणि मराझोच्या विक्रीवरही परिणाम झाला होता. आता नव्या XUV700 चा परिणाम स्कॉर्पिओ आणि XUV500 वर होण्याची चिन्हे दिसत आहेत. XUV500 ने तेव्हा इनोवा क्रिस्टा, फॉर्च्यूनर, टाटा हैरियर या गाड्यांचेही गणित बिघडवले होते. 

Web Title: Mahindra XUV 700 can drop  XUV500 sales; mahindra scorpio close victim 2 years back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.