KTM 125 Duke भारतात लाँच; जाणून घ्या बाइकची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:34 AM2018-11-27T09:34:41+5:302018-11-27T09:37:02+5:30

केटीएम कंपनीने आपली नवीन बाइक केटीएम 125 ड्यूक भारतात लाँच केली आहे.

KTM 125 Duke Launched In India: Priced At ₹ 1.18 Lakh | KTM 125 Duke भारतात लाँच; जाणून घ्या बाइकची खासियत!

KTM 125 Duke भारतात लाँच; जाणून घ्या बाइकची खासियत!

googlenewsNext
ठळक मुद्दे केटीएम 225 ड्यूक भारतात लाँचदिल्लीतील किंमत 1,18,163 रुपये केटीएम 125 ड्यूक सिंगल चॅनल एबीएस युनिट

नवी दिल्ली : केटीएम कंपनीने आपली नवीन बाइक केटीएम 125 ड्यूक भारतात लाँच केली आहे. या बाइकची डिझाइन जास्तकरुन सुरुवातीची केटीएम 200 ड्यूक सारखी मिळती जुळती आहे. केटीएम 225 ड्यूकच्या ग्राफिक्सला रिडिझाइन केले आहे. दरम्यान, केटीएम 125 ड्यूक सध्याची दिल्लीतील किंमत 1,18,163 रुपये इतकी आहे.  

केटीएम 125 ड्यूक सिंगल चॅनल एबीएस युनिटसोबत बाजारात आणली आहे. 200 ड्यूकमध्ये सुद्धा सिंगक चॅनल एबीएस आहे. मात्र, केटीएम 390 ड्यूकमध्ये कंपनीने ड्युअल चॅनल एबीएसचा वापर केला आहे. तर, 125 ड्यूक लाँचिंगदरम्यान 125 सीसीसह एबीएस फीचर असलेली पहिली बाइक आहे. 

केटीएम 125 ड्यूकमध्ये 124.7 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे बाइकला 9,250 आरपीएमवर 14.5 हॉर्स पॉवरची ताकद आणि 8000 आरपीएमवर 12 एनएमचा टॉर्क देऊ शकते. तसेच, या बाइकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. 43MM यूएसडी फ्रॉक आणि एक अॅडजेस्टेबल मोनोशॉक दिला आहे. दरम्यान, केटीएम 125 ड्यूक ही बाइक टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4V एबीएस आणि बजाज पल्सर एनएस 200च्या तोडीस तोड देणारी आहे. कारण, या बाइकच्या किंमतीत ही जास्त मोठा फरक नाही आहे.  
 

Web Title: KTM 125 Duke Launched In India: Priced At ₹ 1.18 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.